ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2 द रुल'मधील 'सामी' गाणं करणार धमाका, जाणून घ्या कधी होणार रिलीज - Pushpa The Rule - PUSHPA THE RULE

Pushpa 2 The Rule Second Single : 'पुष्पा 2 द रुल'मधील 'सामी' गाणं रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. हे गाणं 23 मे रोजी रिलीज होईल.

Pushpa 2
पुष्पा 2 (Pushpa 2 The Rule Second Single (Pushpa 2 The Rule Second Single))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 4:15 PM IST

मुंबई - Pushpa 2 The Rule Second Single : साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2 द रुल'ची रिलीज डेट आता जवळ आली आहे. याआधी 'पुष्पा-पुष्पा' हे पहिलं गाणं रिलीज झालं होतं. 'पुष्पा 2'मधील हे गाणं खूप हिट झालं. या गाण्यावर अनेकांनी रिल्स बनले. आता 'पुष्पा 2 द रुल'चं दुसरं 'सामी' गाणं रिलीज होणार आहे. 'पुष्पा 2 द रुल'च्या निर्मात्यांनी दुसऱ्या गाण्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. आज 22 मे रोजी त्यांनी एक पोस्टर शेअर करत दुसऱ्या गाण्याच्या रिलीज डेटबाबात माहिती दिली आहे.

'पुष्पा 2'चं दुसरे गाणं : अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'चे निर्माते रिलीजपूर्वी चाहत्यांमध्ये उत्साह टिकवून ठेवण्याची एकही संधी सोडत नाहीत. या चित्रपटातील अल्लूचा लूक आधीच चर्चेत होता. दरम्यान 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी रश्मिका मंदान्नाचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टवर त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, "पुष्पा राजनं 'पुष्पा पुष्पा' गाण्यानं खळबळ माजवल्यानंतर आता श्रीवल्ली तिच्या प्रियकरासह मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. 'पुष्पा 2'चं दुसरं गाणं उद्या सकाळी 11:07 वाजता प्रदर्शित होईल." निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये रश्मिका मंदान्नाचे हात दिसत असून ती कथकची मुद्रा करताना दिसत आहे. या गाण्याला देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केलंय.

'पुष्पा 2 द रुल' चित्रपटाची स्टार कास्ट : 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटाच्या रिलीजला 80 दिवस बाकी आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त रिलीज होणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा अल्लू अर्जुनची ॲक्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं आहे. 'पुष्पा 2 द रुल' चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त फहद फासिल, विजय सेतुपती, साई पल्लवी, अनसुया भारद्वाज, प्रियामणी, जगपती बाबू आणि प्रकाश राज यांच्या विशेष भूमिका असणार आहेत. दरम्यान एका रिपोर्टनुसार 'पुष्पा 2 द रुल' 400 कोटीच्या बजेटमध्ये निर्मित करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्सनं केली आहे.

हेही वाचा :

  1. कोलकाता नाईट रायडर्सनं सामना जिंकल्यानंतर शाहरुख खान झाला खूश, चाहत्यांकरिता दिली सिग्नेचर पोझ - Shah rukh Khan signature pose
  2. मनीषा कोईरालानं ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची घेतली भेट, फोटो केले शेअर - Manisha Koirala meets UK PM
  3. करण जोहरच्या आगामी चित्रपटात आयुष्मान आणि साराची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार - AYUSHMANN AND SARA ALI KHAN

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.