ETV Bharat / entertainment

अचानक थिएटरमध्ये पोहोचला कार्तिक आर्यन, बच्चे कंपनीच्या डोळ्यात आनंदाश्रू - पाहा व्हिडिओ - Chandu Champion show - CHANDU CHAMPION SHOW

Kartik Aaryan Little Fan: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनची भूमिका असलेला 'चंदू चॅम्पियन' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अलीकडेच अभिनेता चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका सिनेमागृहात अचानक पोहोचला होता. या शोला शालेय विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी वातावरण भावूक बनलं होतं.

Karthik Aaryan
कार्तिक आर्यन ((ANI Photo))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 20, 2024, 10:11 AM IST

मुंबई - Kartik Aaryan Little Fan: कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेला 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट 14 जून रोजी रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. मात्र, रिलीज झाल्यानंतरही या कार्तिक आर्यननं चित्रपटाचं प्रमोशन थांबवलेलं नाही. गेल्या बुधवारी मुंबईतील अनेक शाळकरी मुलांसाठी विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, कार्तिकनं सिनेमागृहात पोहोचून आपल्या छोट्या चाहत्यांना आश्चर्यचकित करण्याचा निर्णय घेतला. कार्तिक आर्यनला पाहताच सर्व मुले उत्साहित झाली आणि त्याला भेटण्याचा प्रयत्न करू लागली. थिएटरमध्ये दस्तुरखुद्द कार्तिकला पाहून मुलांनी जल्लोष साजरा केला. तर काहींचा विश्वासच बसला नाही. एक मुलगी तर कार्तिकला पाहून रडू लागली.

कार्तिकचे फॅन्स असलेल्या प्रेक्षकांच्यातील बालगोपाळांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. यात एका मुलीला कार्तिकला समोर पाहून भावना अनावर झाल्या व ती रडू लागली. लहान फॅनला रडताना पाहून कार्तिक आर्यनने तिच्याकडे धाव घेतली. त्यावेळी त्यानं तिच्या जवळ गेला आणि तिच्याशी नम्रपणे बोलला. त्या मुलीशी संवाद साधताना त्यांना 'रोती काय को है', म्हणत तिला हसवलं. कार्तिक आर्यनचा हा हावभाव सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कार्तिक आर्यन 'चंदू चॅम्पियन' मध्ये चंदूची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट फ्रीस्टाइल जलतरणातील भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे, राजपाल यादव आणि विजय राज सारखे कलाकार देखील आहेत. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करत कार्तिकनं चाहत्यांचे आभार मानले आहेत. चाहत्यांनीही कमेंट सेक्शनमध्ये प्रतिसाद देत त्याला आनंदी बनवलंय. चंदू चॅम्पियन'नं एका चांगल्या वीकेंडनंतर आता 25 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटानं चौथ्या दिवशी देशांतर्गत जवळपास 6.01 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचं एकूण कलेक्शन आता 30.12 कोटींवर पोहोचलं आहे.

हेही वाचा -

कमल हासन आणि दीपिका पदुकोण 'कल्की 2898 एडी'च्या प्री-रिलीज कार्यक्रमात हजर - kamal haasan

जॉन अब्राहम, बॉबी देओल आणि अर्जुन रामपालची हाऊसफुल फ्रँचायझीमध्ये पुन्हा एन्ट्री - Housefull 5 Movie

दिनेश कार्तिकनं क्रिकेटर्सच्या बायोपिकसाठी 'या' अभिनेत्यांचं सुचवलं नाव... - dinesh karthik

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.