मुंबई - THE GOAT LIFE BOX OFFICE : साऊथ स्टार पृथ्वीराज सुकुमारन याचा उत्कृष्ट अभिनय असलेला सर्व्हायव्हल ड्रामा फिल्म 'द गोट लाइफ'ने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे. ब्लेसी दिग्दर्शित हा चित्रपट 28 मार्च रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कमाई करताना दिसत आहे. आता या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत 100 कोटींची कमाई केली. आज 6 एप्रिल रोजी रिलीजच्या 10 व्या दिवशी चित्रपट किती कमाई करणार आहे ते जाणून घेऊया.
चित्रपटाची पहिल्या आठवड्याची कमाई
या चित्रपटाने पहिल्या दिवशी 7.6 कोटी रुपये कमावले, दुसऱ्या दिवशी 6.25 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 7.75 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 8.7 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 5.4 कोटी रुपये कमावले होते. सहाव्या दिवशी 4.4 कोटी, सातव्या दिवशी 3.75 कोटी, आठव्या दिवशी 3.15 कोटी रुपये. चित्रपटाने नवव्या दिवशी 2.58 कोटी रुपयांची कमाई करत या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 47 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे आणि जगभरातील कलेक्शन 100 कोटींच्या पुढे गेले आहे.
10व्या दिवशी चित्रपटाची कमाई
चित्रपटाने नवव्या दिवशी 2.58 कोटी आणि दहाव्या दिवशी 2 कोटी (अंदाजे) कमावले आहेत. चित्रपटाच्या एकूण देशांतर्गत कलेक्शनने 50 कोटींचा आकडा पार केला आहे आणि जगभरातील कलेक्शन 100 कोटींच्या पुढे गेले आहे.
विशेष म्हणजे 82 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या मूळ मल्याळम भाषेतील सर्व्हायव्हल ड्रामा चित्रपटानं त्याच्या खर्चापेक्षा जास्त कमाई केली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये या चित्रपटाचं खूप कौतुक होत आहे. या चित्रपटासाठी वास्तववादी भूमिकेत प्रवेश करण्यासाठी अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनला तीन दिवस उपाशी राहावे लागले होते. हा चित्रपट भारतीय स्थलांतरित कामगार नजीब मोहम्मदची सत्यकथा कथा आहे. कामाच्या शोधात सौदी अरेबियामध्ये गेलेला हा तरुण अडकला आणि त्याला आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्याचा सामना करावा लागला.
हेही वाचा -