ETV Bharat / entertainment

स्वातंत्र्य दिन 2024 : स्वातंत्र्यदिनी 'या' पाहा देशभक्तीपर वेब सीरीज, जाणून घ्या कोणत्या आहेत खास - Independence Day 2024 Special - INDEPENDENCE DAY 2024 SPECIAL

Independence Day 2024 Special : तुम्ही स्वातंत्र्य दिन 2024 कसा साजरा करत आहात? जर तुमचा काही खास प्लान नसेल, तर तुम्ही घरबसल्या देशभक्तीशी संबंधित काही मनोरंजक वेब सीरीज पाहू शकता.

independence day 2024 special
स्वातंत्र्यदिन 2024 स्पेशल ((Web Series Posters/ETV Bharat))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 14, 2024, 10:54 AM IST

Updated : Aug 14, 2024, 12:56 PM IST

मुंबई Independence Day 2024 Special : 15 ऑगस्ट रोजी आपण खूप जल्लोषात स्वातंत्र्यदिन साजरा करतो. या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी देशभक्तीपर गाणी लावली जातात. हा दिवस देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचा आहे. दरम्यान अनेकजण स्वत:चं मनोरंजन करण्यासाठी देशभक्तीपर चित्रपट पाहून हा दिवस एंजॉय करतात. काही काल्पनिक कहाण्या देशभक्तीची भावना जागृत करण्यात मोलाचा वाटा उचलतात. जर तुम्हाला असाच काही कंटेंट घरी बसून पाहायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी देशभक्तीवर आधारित वेब सीरीजची यादी घेऊन आलो आहोत. यामधून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला काय पाहायचं आहे.

'द फॅमिली मॅन' : मनोज बाजपेयी स्टारर 'द फॅमिली मॅन' ही देशभक्तीवर आधारित सर्वोत्कृष्ट वेब सीरीजपैकी एक आहे. या वेब सीरीजचे 2 सीझन आहेत. दोन्ही सीझन खूपच अप्रतिम आहेत. मनोज बाजपेयी, प्रियामणी, शारिब हाश्मी, समांथा रुथ प्रभू यांसारख्या कलाकारांची भूमिका असलेली ही वेब सीरीज तुमच्यातील देशभक्तीची भावना जागृत करण्यात यशस्वी ठरेल. 'द फॅमिली मॅन'चे दोन्ही सीझन 2019 आणि 2021 मध्ये रिलीज झाले होते. ही वेब सीरीज अ‍ॅमेजन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

'मुंबई डायरीज' : दहशतवादी हल्ल्यांबद्दल बोलताना आपण रुग्णालयांवर होणारे परिणाम मात्र विसरुन जातो. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरांना अनेक कठिण परिस्थितींना सामोरं जावं लागलं होतं. 'मुंबई डायरीज' या वेब सीरीजमध्ये 26/11 घटनेबद्दल वास्तविकता दाखवली गेली आहे. मोहित रैना आणि कोंकणा सेन शर्मा अभिनीत ही वेब सीरीज दहशतवादी हल्ल्याचा सामना करताना रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर लोकांना वाचवण्यासाठी काय करतात, हे यात दाखवलं गेलं आहे. ही वेब सीरीज तुम्ही अ‍ॅमेजन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

'द फॉरगॉटन आर्मी' : ही वेब सीरीज स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील इंडियन नॅशनल आर्मी (INA) च्या स्त्री-पुरुषांच्या सत्य घटनांवर आधारित आहे. द्वितीय विश्वयुद्धात जपानच्या साम्राज्यात सामील झालेल्या भारतीय सैनिकांपासून उद्भवलेल्या आयएनए (INA) कडे 1917-1918 च्या रशियन युनिटनंतर पहिली महिला -पुरुष पायदळ रेजिमेंट होती. या वेब सीरीजमध्ये दाखवलं गेलं आहे, की हे सैनिक भारताला स्वतंत्र करण्यासाठी अडचणींविरुद्ध कसे लढतात. मात्र त्यांचा संघर्ष आणि कहाणी कशी हरवली आणि ते 'विसरलेले सैन्य' बनले या सीरीजमध्ये सुंदर पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. या वेब सीरीजमध्ये सनी कौशल आणि शर्वरी वाघ यांनी विशेष भूमिका साकारल्या आहेत. ही वेब सीरीज अ‍ॅमेजन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

'भौकाल' : खऱ्या घटनांनी प्रेरित असलेली, 'भौकाल' ही वेब सीरीज 2003 मध्ये भारतातील गुन्हेगारीची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुझफ्फरनगरमधील घटनेवर आधारित आहे. एक धाडसी अधिकारी गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी त्यांच्या क्लिन-अप मोहिमेवर कसा जातो, हे या वेब सीरीजमध्ये दाखवण्यात आलं आहे. या वेब सीरिजमध्ये मोहित रैना मुख्य भूमिकेत आहे आणि ही सीरीज ॲक्शन-पॅक क्राइम थ्रिलर आहे. 'भौकाल' वेब सीरीज एमएक्स प्लेयरवर मोफत उपलब्ध आहे.

'कोड एम' : अभिनेता रजत कपूर आणि जेनिफर विंगेट आणि मोनिका मेहरा यांच्या भूमिका असलेली ही वेब सीरीज भारतीय सैन्याशी संबंधित आहे. या वेब सीरीजमध्ये जेनिफरनं अप्रतिम अभिनय केला आहे.

हेही वाचा :

  1. स्वातंत्र्यदिन विशेष : हृतिक रोशन ते सिद्धार्थ मल्होत्रापर्यंत 'या' स्टार्सनं जवानाची भूमिका साकारून जिंकलं प्रेक्षकांचं मन - Independence Day 2024

Last Updated : Aug 14, 2024, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.