ETV Bharat / entertainment

करीना कपूर स्टारर 'द बकिंगहॅम मर्डर्स'चा टीझर रिलीज, पाहा व्हिडिओ - The Buckingham Murders - THE BUCKINGHAM MURDERS

TBM Teaser Out : करीना कपूरचा आगामी क्राईम थ्रिलर 'द बकिंगहॅम मर्डर्स'चा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट यावर्षी रुपेरी पडद्यावर सप्टेंबरमध्ये रिलीज होईल.

TBM Teaser Out
द बकिंगहॅम मर्डर्सचा टीझर आऊट (द बकिंगहॅम मर्डर्स (@mahana_films Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 20, 2024, 6:22 PM IST

मुंबई - TBM Teaser Out : अभिनेत्री करीना कपूर स्टारर आगामी क्राईम थ्रिलर 'द बकिंगहॅम मर्डर्स'चा टीझर आज 20 ऑगस्टला प्रदर्शित करण्यात आला आहे. आता हा टीझर पाहिल्यानंतर करीना कपूरच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. हंसल मेहता दिग्दर्शित आणि करीना कपूर खान, शोभा कपूर आणि एकता कपूर यांची निर्मिती असलेला हा चित्रपट यावर्षी सप्टेंबरमध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षी जियो मामी फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता. यानंतर हा चित्रपट खूप चर्चेत आला होता. या चित्रपटामध्ये करीनाचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'द बकिंगहॅम मर्डर्स'चा टीझर रिलीज : मंगळवारी, निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'द बकिंगहॅम मर्डर्स'चा अधिकृत टीझर शेअर करत करीना कपूरच्या व्यक्तिरेखेचा खुलासाही केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये निर्मात्यांनी लिहिलं की, "डिटेक्टिव सार्जेंट जसमीत भामराला भेटा. ती लपवलेली सत्ये कशी प्रकट करते ते पाहा." 'द बकिंगहॅम मर्डर्स'मध्ये करीना कपूर एका डिटेक्टिव सार्जेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान टीझरची सुरुवात एका हृदयद्रावक घटनेनं होते. यानंतर करीना ही क्राइम मिस्ट्री सॉल्व करताना दिसते. टीझरमध्ये करीना कपूरचं पात्र 'जस्मीत भामरा' तिच्या हरवलेल्या मुलाच्या शोधात असते. हा शोध सुरू असताना 'जस्मीत भामरा'ला अशा अनेक दृश्यांना सामोरं जावे लागले, ज्यामुळे ती आई म्हणून कमकुवत होते. टीझरचा शेवट एका रक्तरंजित दृश्यानं होतं.

'द बकिंगहॅम मर्डर्स'च्या टीझरला मिळाली पसंती : करीना कपूरनं तिच्या इन्स्टाग्रामवर आगामी चित्रपटाचा टीझरही शेअर केला आहे. यामध्ये तिनं कॅप्शनमध्ये चित्रपटाची रिलीज डेट 13 सप्टेंबर अशी लिहिली आहे. करिना कपूरच्या रिलीज झालेल्या या टीझरवर फॅशन डिझायनर रिया कपूर आणि चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. रियानं पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये फायर इमोजी पोस्ट केले आहेत. याशिवाय 'द बकिंगहॅम मर्डर्स'चा टीझर चाहत्यांना देखील खूप आवडला आहे. एका चाहत्यानं यावर पोस्टवर लिहिलं, "धमाकेदार टीझर, चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहतोय." दुसऱ्या एका चाहत्यानं यावर लिहिलं, "राष्ट्रीय पुरस्कार लोडिंग" आणखी एकानं लिहिलं, "हा ब्लॉकबस्टर चित्रपट असेल." हंसल मेहता दिग्दर्शित 'द बकिंगहॅम मर्डर्स'मध्ये करीना कपूर खान आणि रणवीर बरार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय या चित्रपटामध्ये ॲश टंडन, असद राजा, प्रभलीन संधू, संजीव मेहरा, अडवोआ अकोटो, झैन हुसैन यांसारखे कलाकार आहेत. हा चित्रपट 13 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

हेही वाचा :

  1. आयुष्मान खुरानानं करीना कपूर स्टारर मेघना गुलजारचा चित्रपट नाकारला, आलं कारण समोर - Ayushmann and Meghna Gulzar
  2. अनन्या, सारा आणि जान्हवी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीसाठी रवाना - Anant Radhika Pre wedding - Anant Radhika Pre wedding
  3. गरोदरपणाच्या पुस्तकात धर्मग्रंथाचं नाव वापरल्यानंतर उच्च न्यायालयानं करीना कपूरला बजावली नोटीस - kareena kapoor khan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.