ETV Bharat / entertainment

थलपथी विजय स्टारर 'गोट'नं केली पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई - box office collection - BOX OFFICE COLLECTION

GOAT Movie : थलपथी विजय अभिनीत 'गोट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवत आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी, 'इंडियन 2'च्या ओपनिंग डे कलेक्शनचा विक्रम मोडला आहे.

GOAT Movie
गोट चित्रपट (GOAT Sets Box Office on Day 1 (Film Poster/ ETV Bharat))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 6, 2024, 11:23 AM IST

मुंबई - GOAT Movie : थलपथी विजय स्टारर 'गोट' (द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) हा 5 सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'गोट'नं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये धमाकेदार कमाई केली होती. आता हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा तमिळ ओपनर ठरू शकतो, असं बोललं जात आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 44.42 कोटीची धमाकेदार कमाई केली आहे. 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' या चित्रपटानं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 29.83 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाचं चाहत्यांनामध्ये खूप क्रेझ आहे. 'गोट' चित्रपटानं कमल हासन स्टारर 'इंडियन 2'ला देखील मागे टाकले आहे.

'गोट' चित्रपटाची स्टार कास्ट : एजीएस एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मित झालेला 'गोट' या चित्रपटाचं दिग्दर्शन व्यंकट प्रभू यांनी केलंय. या चित्रपटामध्ये विजय दुहेरी भूमिकेत आपला जलवा दाखवतोय. 'गोट' मध्ये विजय व्यतिरिक्त चंद्रशेखर, प्रभू देवा, प्रशांत, अजमल अमीर, स्नेहा, मीनाक्षी चौधरी आणि योगी बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान 'इंडियन 2'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 25.6 कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली. आता थलपथी विजयच्या 'गोट'नं हा आकडा पार केला आहे. हा चित्रपट खूप वेगानं बॉक्स ऑफिसवर कमाई करेल असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे. 'गोट' चित्रपट पाहण्यासाठी आता चित्रपटगृहांमध्ये खूप गर्दी पाहायला मिळत आहे.

राजकारणात प्रवेश केल्यानंतर विजयचा पहिला चित्रपट : थलपथी विजय शेवटचा 2023 मध्ये आलेल्या 'लिओ' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. राजकारणात आल्यानंतर विजयचा 'गोट' हा पहिलाच चित्रपट आहे. 2 फेब्रुवारी 2024 रोजी विजयनं आपला राजकीय पक्ष, 'तमिलगा वेत्री कझगम'ची घोषणा केली होती. आता यानंतर विजय हा त्याच्या राजकीय पक्षाकडे लक्ष देईल, असा तर्क त्याच्या चाहत्यांनी लढवला आहे. 'गोट' हा त्याचा शेवटचा चित्रपट असण्याची शक्यता त्याच्या फॅन्सने विजयच्या आधीच्या वक्तव्यांच्या आधारावर वर्तवली आहे.

हेही वाचा :

  1. थलपथी विजय स्टारर 'गोट' रुपेरी पडद्यावर झळकला, जगभरातील चाहते खुश - Vijay Thalapathy
  2. थलपथी विजय स्टारर 'गोट'च्या मॉर्निंग शोसाठी याचिका दाखल, निर्णय येणं बाकी - vijay Movie
  3. तमिळ सुपरस्टार विजयनं त्याच्या पक्षाच्या ध्वजाचं केलं अनावरण, पाहा व्हिडिओ - Actor Vijay

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.