ETV Bharat / entertainment

थलपथी विजय स्टारर 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम'चं यूकेमध्ये होईल द लाईट थिएटरमध्ये विशेष स्क्रीनिंग - thalapathy vijay film - THALAPATHY VIJAY FILM

GOAT Movie : थलपथी विजय अभिनीत 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम'चं यूकेच्या द लाईट थिएटरमध्ये विशेष स्क्रीनिंग होणार आहे. याबद्दल निर्मात्यांनी एक अपडेट शेअर केली असून हा चित्रपट रिलीज होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत.

GOAT Movie
गोट चित्रपट (द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईमचं पोस्टर (@ahimsaentertainment Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 2:31 PM IST

मुंबई - GOAT Movie : थलपथी विजयचा आगामी चित्रपट 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाचं आगाऊ बुकिंग जाहीर केलं होतं. आता निर्मात्यांनी या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट शेअर केली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम'चं स्पेशल स्क्रीनिंग देशात नाही तर परदेशात होणार आहे. 31 जुलैच्या संध्याकाळी 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम'च्या स्पेशल स्क्रीनिंगशी संबंधित एक बातमी समोर आली होती. चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी सांगितलं की, "यू.के. कुटुंबीय, 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम'ची तिकिटे मिळवणारे तुम्ही पहिले आहात. थलपथी विजय यूकेच्या द लाईट थिएटरमध्ये पडद्यावर चमकण्यासाठी दिवस मोजत आहेत. आत्ताच तुमच्या जागा बुक करा." थलपथी विजयचा हा चित्रपट खूप दिवसांपासून चर्चेत आहे.

'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम'मध्ये विजय दिसणार दुहेरी भूमिकेत : निर्मात्यांनी थलपथीच्या वाढदिवसानिमित्त 22 जून रोजी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. समोर आलेल्या टीझरमध्ये थलपथी विजय हा दुहेरी भूमिकेत दिसला होता. निर्मात्यांच्या या सरप्राईजमुळे विजयच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत उत्सुकता वाढली होती. व्यंकट प्रभू दिग्दर्शित 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' हा चित्रपट 5 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर तेलुगू व्यतिरिकेत हिंदी भाषेतही रिलीज होईल. थलपथी विजय या चित्रपटामध्ये अभिनेता-कोरियोग्राफर प्रभू देवा, प्रशांत, मोहन, जयराम, स्नेहा, लैला, अजमल अमीर, मीनाक्षी चौधरी, योगी बाबू आणि वैभव यांच्याबरोबर दिसणार आहे.

'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' चित्रपटाबद्दल : 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' या चित्रपटाची अनेक पोस्टर्स रिलीज करण्यात आली होती. ही पोस्टर्स चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटाचं बजेट सुमारे 300 कोटी रु. आहे. 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' चित्रपटाला संगीत हे युवान शंकर राजा यांनी दिलं आहे. या चित्रपटाची निर्मिती कलापती एस. अघोराम, कलापती एस. गणेश, कलापती एस. सुरेश यांनी केली आहे. दरम्यान विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'लिओ' या चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर त्रिशा कृष्णन दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

हेही वाचा :

  1. थलपथी विजयच्या वाढदिवसानिमित्त G.O.A.T चा थरारक अ‍ॅक्शन टीझर लॉन्च - Thalapathy Vijay birthday
  2. थलपती विजयच्या 'GOAT' ची उत्कंठा शिगेला, दुसरं गाणं जूनमध्ये झळकणार - Thalapathy Vijay
  3. Thalapathy Vijay : 'गोट'च्या शुटिंगसाठी केरळमध्ये आलेल्या थलपथी विजयला पाहायला आले लाखोच्या संख्येत चाहते

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.