ETV Bharat / entertainment

हळवी भावनिक प्रेमकथा असलेल्या 'ऊन सावली' चित्रपटाचा टीझर रिलीज - शिवानी सुर्वे

movie Unn Sawali Teaser : दिवाकर नाईक दिग्दर्शित 'ऊन सावली' या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा एक इमोशनला रोमँटिक चित्रपट आहे. काही दिवसापूर्वी याचे शीर्षक गीत रिलीज करण्यात आलं होतं. हा चित्रपट येत्या 15 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

movie Unn Sawali Teaser
एक अ‍ॅरेंज मॅरेजही अदभूत लव्ह स्टोरी असू शकते, असे या चित्रपटाच्या पोस्टवरील बायलाईन लक्ष वेधणारी आहे. यातून अ‍ॅरेंज मॅरेज होईल का असे टीझर पाहून वाटण्यापेक्षा ते होणार आहे हे गृहित धरायला हरकत नसावी. मनाचा ठाव घेणारी ही प्रेमकथा असेल असा अंदाज वर्तवायला संधी आहे. चित्रपटाच्या ऊन सावली तू माझी ऊन सावली, आली कशी प्रीत मनी झूरु बावरी या शीर्षक गीतातूनही हे स्पष्ट झालेयं. लिश्वजीत रानडे आणि आदित्य पवार यांनी लिहिलेलं हे गीत सार्थक नकुलनं संगीतबद्ध केलं असून नकुल देशमुखनं गायलं आहे.
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 4:34 PM IST

मुंबई - movie Unn Sawali Teaser : अभिनेता भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे या रोमँटिक जोडीची भूमिका असलेला 'ऊन सावली' हा चित्रपट गेल्या काही आठवड्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा अधिकृत टीझर निर्मात्यांनी रिलीज केला आहे. दिवाकर नाईक दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 15 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे. प्रणय आणि आन्वी यांच्या लग्नाची घाई त्यांच्या पालकांना झाली आहे. दरम्यान, प्रणयला आन्वीचे स्थळ चालून येते. खरंतर दोघांनाही लग्न करण्याची इच्छा नाही. पण ते एकमेकांना जेव्हा पाहतात तेव्हा प्रणयला आन्वी खूप आवडते. तो पाहता क्षणीच तिच्या प्रेमात पडतो. पण ती आपल्या लग्न न करण्याच्या भूमिकेवर ठाम राहते. त्याच्यांतील ही न अंकुरणारी प्रेमाच्या गोष्टीला बहर येणार का, हे चित्रपटात पाहणे रंजक असणार आहे.

'ऊन सावली'चा टीझर खूपच गोड आणि रोमँटिक आहे. भूषण आणि शिवानीची फ्रेश जोडी आश्वासक वाटते. यापूर्वी चित्रपटाचे शीर्षक गीत रिलीज करण्यात आले होते. प्रेमाचा वेगळा आनंद देणारी ही हळवी प्रेमकथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते की नाही यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.

एक अ‍ॅरेंज मॅरेजही अदभूत लव्ह स्टोरी असू शकते, असे या चित्रपटाच्या पोस्टवरील बायलाईन लक्ष वेधणारी आहे. यातून अ‍ॅरेंज मॅरेज होईल का असे टीझर पाहून वाटण्यापेक्षा ते होणार आहे हे गृहित धरायला हरकत नसावी. मनाचा ठाव घेणारी ही प्रेमकथा असेल असा अंदाज वर्तवायला संधी आहे. चित्रपटाच्या 'ऊन सावली तू माझी ऊन सावली, आली कशी प्रीत मनी झूरु बावरी' या शीर्षक गीतातूनही हे स्पष्ट झालेयं. विश्वजीत रानडे आणि आदित्य पवार यांनी लिहिलेलं हे गीत सार्थक नकुलनं संगीतबद्ध केलं असून नकुल देशमुखनं गायलं आहे.

तिकीट विंडो पिक्चर्सने 'ऊन सावली'ची निर्मिती केली असून भूषण प्रधान, शिवानी सुर्वेसह अजिंक्य ननवरे, राज सरनागत, अंकिता भोईर, विकास हांडे, श्वेता कामत, प्रिया तुळजापूरकर, मनाली निकम यासारखे कलाकार यामध्ये भूमिका साकारत आहेत.

हेही वाचा -

  1. विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती?, सोशल मीडियावरील चर्चांना रितेश देशमुखचा एकाच वाक्यात रिप्लाय
  2. विमानाचे अपहरण करण्यांना धूळ चारण्यासाठी सिद्धार्थ मल्होत्रा सज्ज, योद्धाचा टीझर रिलीज
  3. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा टायटल ट्रॅक रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.