मुंबई - Tabu Nagarjuna : सध्या तब्बू तिच्या आगामी 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती बऱ्याच दिवसांनी अजय देवगणबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. यापूर्वी तब्बूचा 'क्रू' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर खूप कमाई केली होती. वयाच्या 52 व्या वर्षीही तब्बू आपल्या अभिनयानं चाहत्यांचं मन जिंकत आहे. तब्बू अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान एक काळ असा होता की तब्बू आणि नागार्जुन एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. आता नुकतंच तब्बूनं असं काही केलं आहे की, ज्यामुळे ही प्रेमकहाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
नागा चैतन्यच्या फोटोवर तब्बूनं दिली प्रतिक्रिया : अलीकडेच 'फादर्स डे'च्या निमित्तानं नागा चैतन्यनं त्याचे वडील नागार्जुनबरोबरचा एक जुना फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोत नागार्जुन पट्टेदार शर्टमध्ये अतिशय देखणा दिसत आहे. याशिवाय नागा चैतन्य त्याच्या खांद्यावर बसलेला दिसत आहे. यानंतर या फोटोवर तब्बूनं प्रेमाचा वर्षाव केला. तिनं फोटोवर बरेच हार्ट इमोजी पोस्ट केले. आता अनेक युजर्स तब्बूच्या प्रतिक्रियेबद्दल आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. नागा चैतन्यनं शेअर केलेला हा फोटो अनेकांना आवडत आहे. या फोटोवर अनेकजण कमेंट्स करू त्याचे आणि नागार्जुनचं कौतुक करताना दिसत आहेत.
तब्बूचं वर्क फ्रंट : नागार्जुन आणि तब्बू यांनी तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. यात तेलुगू चित्रपट 'निन्ने पेल्लाडता', 'सीसिंदरी' आणि 'आविडा मा आविदे' यांचा समावेश आहे. 'निन्ने पेल्लाडता' आणि 'आविडा मा आविदे' दोन चित्रपटांना सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. आता तब्बू लवकरच 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र हिरावत, कुमार मंगत पाठ, संगीता अहिर आणि शीतल भाटिया यांनी केली आहे. हा चित्रपट 5 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'औरों में कहां दम था' हा अजय देवगण आणि तब्बू यांचा एकत्र 10वा चित्रपट आहे. अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त या चित्रपटात जिमी शेरगिल, सई मांजरेकर आणि शंतनू माहेश्वरी देखील दिसणार आहेत.
हेही वाचा :