ETV Bharat / entertainment

'फिर आयी हसीन दिलरुबा'च्या रिलीजपूर्वी तापसी पन्नूनं दिली 'हसीन दिलरुबा 3'ची हिंट - Haseen Dillruba - HASEEN DILLRUBA

Haseen Dillruba 3: तापसी पन्नू आणि विक्रांत मॅसी अभिनीत 'हसीन दिलरुबा' या हिट चित्रपटाचा सीक्वेल 'फिर आयी हसीन दिलरुबा' 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. रिलीजपूर्वीच तापसीनं तिसऱ्या भागाबद्दल हिंट दिली आहे.

Haseen Dillruba 3
हसीन दिलरुबा 3 (फिर आयी हसीन दिलरुबा (Film Posters))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 6, 2024, 5:37 PM IST

मुंबई - Phir Aayi Haseen Dillruba : अभिनेत्री तापसी पन्नू आणि विक्रांत मॅसी स्टारर 'हसीन दिलरुबा' 2021 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाला समीक्षकांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. आता 3 वर्षानंतर 'हसीन दिलरुबा'चा सीक्वेल 'फिर आयी हसीन दिलरुबा' 9 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. दरम्यान तापसीनं तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अलीकडेच तिनं 'हसीन दिलरुबा 3'ची हिंट दिली आहे. यानंतर तिचे चाहते देखील खुश आहेत.

'हसीन दिलरुबा' तापसीनं दिला इशारा : 'फिर आयी हसीन दिलरुबा' हा तापसी आणि कनिका ढिल्लनचा पाचवा सहयोग चित्रपट आहे. याआधी त्यांनी 'मनमर्जियां', 'हसीन दिलरुबा', 'रश्मि रॉकेट' आणि 'डंकी'मध्ये एकत्र काम केलं आहे. कनिकाबद्दल तापसीनं एका संवादादरम्यान म्हटलं, "फक्त कनिकाच मला अशी ग्रे कॅरेक्टर करायला लावू शकते. तिच्या कहाणीत लीड एक्ट्रेस या चुका करतात आणि त्या स्वीकारतात. ही एक खास गोष्ट आहे. खरं सांगायचं झालं तर लेखक-अभिनेत्री म्हणून आम्ही दोघेही एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीनं समजतो." जेव्हा तापसीला विचारण्यात आलं की, 'हसीन दिलरुबा'चा तिसरा पार्ट सुद्धा येत आहे का ? तेव्हा तिनं उत्तर दिलं, "मी विक्रांत आणि सनी सारखे वाचन करत नाही, मात्र मी कनिकाला तिचा तिसरा भाग बनवण्यासाठी नक्कीच पुस्तक देईन."

तापसीची इच्छा : पुढं तिनं म्हटलं, "हसीन दिलरुबा' पुन्हा पुन्हा येत राहावी अशी माझी इच्छा आहे. माझे आणि कनिकाचे भविष्यात तुम्हाला आणखी बरेच सहकार्य पाहायला मिळेल. आम्ही अनेक गोष्टींचा विचार करत आहोत." यावेळी सनी कौशल देखील 'फिर आयी हसीन दिलरुबा'च्या कलाकारांमध्ये आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये यावेळी जिमी शेरगिल, गौतम एस. गदाबल्ली आणि विवेक झा यांच्या देखील महत्वाच्या भूमिका असणार आहेत. यावेळी दुसऱ्या भागामध्ये विक्रांत मॅसीचा थरारक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपटाची निर्मिती ही जयप्रद देसाई यांनी केली आहे.

हेही वाचा :

  1. तापसी पन्नू ,विक्रांत मॅसी आणि सनी कौशल स्टारर 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - PHIR AAYI HASSEEN DILLRUBA
  2. 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा ट्रेलर होईल उद्या प्रदर्शित, पोस्ट व्हायरल - PHIR AAYI HASSEEN DILLRUBA Movie
  3. तापसी पन्नू आणि विक्रांत मॅसी आणि सनी कौशल स्टारर 'फिर आयी हसीन दिलरुबा'चं नवीन पोस्टर रिलीज - PHIR AAYI HASSEEN DILLRUBA POSTER

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.