ETV Bharat / entertainment

करण जोहर म्हणाला 'मुर्ख', दिव्या कुमारला संताप अनावर !! - DIVYA KHOSLA CRITICIZES KARAN JOHAR

टी-सीरीजची निर्माती दिव्या खोसला कुमारची करण जोहर आणि आलिया भट्टवर टीका, दोघांशी का बिनसलंय हे वाचा.

Divya Khosla Kumar, Karan Johar and Alia Bhatt
दिव्या, करण आणि आलिया ((IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 16, 2024, 8:05 PM IST

मुंबई - दिव्या कुमार खोसला हिने आलिया भट्टच्या 'जिगरा' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर प्रश्न उपस्थित केला होता. आलिया स्वतः चित्रपटाची तिकिटे विकत घेत असते आणि जिगराचं कलेक्शन भरपूर असल्याचं सांगत असते, असा दावा दिव्या कुमार यांनी केला होता. सध्या 'जिगरा' बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत आहे. 'जिगरा' 11 ऑक्टोबरला रिलीज झाला आणि गेल्या 5 दिवसात 20 कोटींचीही कमाई करू शकलेला नाही. सकनिल्कच्या आकड्यांनुसार आलियाच्या स्टारडमनुसार चित्रपटाने 5 दिवसांत 19 कोटी रुपये कमावले आहेत. 'जिगरा'ची निर्मिती करण जोहरने केली आहे. 'जिगरा'बद्दल दिव्याच्या वक्तव्यानंतर करण जोहरनं तिला 'मूर्ख' म्हटलं होतं. आता करणच्या या वक्तव्यावर दिव्या खोसला भडकली आहे.

करण जोहर दिव्याला म्हणाला मूर्ख

यापूर्वी दिव्याने 'जिगरा' आणि आलियाबद्दल सांगितलं होतं की, आलिया भट्टचा 'जिगरा' चित्रपट चालत नाही, मी इथल्या मल्टिप्लेक्समध्ये गेले होते आणि पाहिलं की थिएटर्स रिकामे आहेत. आलिया स्वतः चित्रपटाची तिकिटे खरेदी करत आहे आणि चित्रपटाचे कलेक्शन वाढत असल्याचं दाखवत आहे. यावर आलिया काहीही बोलली नाही, मात्र करण जोहरने दिव्याचे नाव न घेता पोस्ट केली आहे, 'मूर्खांसाठी मौन हे सर्वोत्तम उत्तर आहे'. यावर दिव्याने करणचे नाव न घेता लिहिले की, 'सत्य मूर्खांना भडकवते, जेव्हा इतरांच्या वस्तू निर्लज्जपणे चोरल्या जातात तेव्हा अशा लोकांसाठी आवाज उठत नाही'.

दिव्याचा करण जोहरवर पलटवार

आता एका मुलाखतीत दिव्याने करण जोहरच्या उत्तराला उघडपणे पलटवार केला आहे. दिव्या म्हणाली, 'आज जेव्हा मी चुकीच्या विरोधात उभी आहे, तेव्हा मिस्टर करण जोहर मला मूर्ख म्हणत आहे. चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवणाऱ्या महिलेला मूर्ख म्हणणे योग्य आहे का? याचा जराविचार करा, माझ्यासोबत हे घडत असताना बाहेरच्या लोकांची काय अवस्था असेल. हे महाशय म्हणजे चित्रपटसृष्टीत राजे नाहीत, इथे कुणी असं वागू शकत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.