ETV Bharat / entertainment

सुशांत सिंग राजपूतच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या 'या' विशेष गोष्टी - सुशांत सिंग राजपूतचा वाढदिवस

Sushant Singh Rajput : अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा 38वा वाढदिवस आहे. या विशेष प्रसंगी त्याचे अनेक चाहते अभिनेता सुशांतची आठवण करत आहेत. सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजूनही चाहत्यांनी स्वीकारलेले नाही.

Sushant Singh Rajput
सुशांत सिंग राजपूत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 12:34 PM IST

मुंबई - Sushant Singh Rajput: अभिनेता सुशांत सिंगनं कमी वेळात चित्रपटसृष्टीत खूप नाव कमवलं. सुशांत हा हिंदी चित्रपटसृष्टीचा उगवता तारा होता. याता अनेकजण पसंत करत होते. आपल्या कारकिर्दीत त्यानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. चित्रपट व्यतिरिक्त, सुशांत त्याच्या वैयक्तिक आयुष्यातदेखील एक अतिशय मनोरंजक व्यक्ती होता. त्यानं खूप कमी वयात हे जग सोडलं. मात्र आजही त्याला अनेकजण आठवण करतात. त्याचे अनेक रिल्स हे सोशल मीडियावर त्याचे चाहते तयार करत असतात. आज सुशांतच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

सुशांत सिंग राजपूतचा वाढदिवस : सुशांतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी बिहारच्या पाटणा शहरात झाला. सुशांत हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. सुशांतला आधीपासूनचं चित्रपटसृष्टीत काम करायचं होतं. चित्रपटसृष्टीत कुठलाही गॉडफादर नसताना त्यानं त्यांच स्वप्न पूर्ण केलं. तो एक यशस्वी अभिनेता झाला. 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून त्याची घराघरात ओळख झाली. 2013 मध्ये 'काई पो चे' या चित्रपटातून त्यानं आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. सुशांतच्या पहिल्या चित्रपटापासूनचं त्याला अनेकजण पसंत करू लागले. बॉलिवूड सेलिब्रिटींनाही त्याच्या टॅलेंटची खात्री पटली होती. 'काई पो चे' या चित्रपटानंतर सुशांत 'शुद्ध देसी रोमान्स' 'पीके' आणि 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी'मध्ये दिसला होता.

सुशांतचं करिअर : 'एमएस धोनी द अनटोल्ड' स्टोरी हा चित्रपट त्याचा करिअर टर्निंग पॉइंट ठरला. हा चित्रपट क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर 250 कोटींहून अधिक कमाई केली आहे. यानंतर सुशांत 'केदारनाथ' आणि 'सोनचिरिया'मध्येही दिसला. या चित्रपटांसाठी त्याचे खूप कौतुक झाले. मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला सुशांतचा शेवटचा चित्रपट 'छिछोरे' होता. प्रत्येक चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये आकारणाऱ्या सुशांतनं राजकुमार हिराणी यांच्या 'पीके' चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती.

सुशांत सिंगचा मृत्यू : पीके चित्रपटातील 15 मिनिटांच्या भूमिकेसाठी त्यानं राजकुमार हिराणी यांच्याकडून एकही पैसा घेतला नाही. मात्र, हिराणी यांनी त्याला 21 रुपये भेट म्हणून दिले. सुशांतनं ते आनंदाने स्वीकारले. सुशांतचं 14 जून 2020 मध्ये निधन झालं. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत संजना सांघी दिसली होती.

हेही वाचा :

  1. सानिया मिर्झाच्या चाहत्यांकडून शोएब मलिक ट्रोल, तिसरं लग्न केल्यानं सुनावलं!
  2. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात झालेला 'खुला' काय आहे?
  3. "हे भजन गाताना प्रत्यक्ष राम समोर असल्याचा अनुभव आला", सचिन पिळगावकरांची ETV Bharat शी खास बातचित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.