ETV Bharat / entertainment

सूर्या - बॉबी देओल स्टारर 'कांगुवा'चं नवीन ट्रेलर रिलीज, पाहा स्टार्सचा थरारक अंदाज...

सूर्या आणि बॉबी देओल अभिनीत 'कांगुवा' चित्रपटामधील नवीन ट्रेलर रिलीज झालं आहे. हा ट्रेलर खूप धमाकेदार आहे.

Kanguva Release Trailer out
कांगुवाचं ट्रेलर रिलीज (Kanguva - film poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 10, 2024, 9:53 PM IST

मुंबई - साऊथ अभिनेता सूर्या आणि बॉबी देओल स्टारर बिग बजेट 'कांगुवा' चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. स्टुडिओ ग्रीन फिल्म्स तर्फे 'कांगुवा' चित्रपटाची निर्मिती केली गेली आहे. 'कांगुवा' या वर्षातील मोठ्या चित्रपटांपैकी एक असल्याचं बोललं जात आहे. 'कांगुवा'चे निर्माते के. ई. ज्ञानवेल राजा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवा यांनी केलं आहे. दरम्यान आता या चित्रपटामधील नवीन ट्रेलर रविवारी, 10 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आले आहे. दरम्यान हा रिलीज झालेला ट्रेलर खूप धमाकेदार असून यामध्ये सूर्याचा अंदाज थरारक असल्याचा दिसत आहे. 'कांगुवा' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर 14 नोव्हेंबर रोजी दाखल होणार आहे.

'कांगुवा'ची स्टार कास्ट : आता रुपेरी पडद्यावर रिलीज होण्यासाठी या चित्रपटाला फक्त 4 दिवस उरले आहेत. दरम्यान 'कांगुवा' या चित्रपटामध्ये सूर्या हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. 'कांगुवा' चित्रपटात बॉबी देओल, खलनायकाच्या भूमिकेत असेल. याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकेल. याशिवाय योगी बाबूचा देखील या चित्रपटात वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळेल. तसेच 'कांगुवा'मध्ये रेडिन किंग्सले, नटराजन सुब्रमण्यम, कोवई सरला, आनंदराज आणि केएस रविकुमार हे सहाय्यक कलाकार म्हणून दिसेल. 'कांगुवा'मध्ये अनिरुद्ध रविचंदरचा एक खास कॅमिओ देखील आहे.

'कांगुवा'चा बजेट : 'कांगुवा'चं एकूण बजेट 300-350 कोटींच असून आता सूर्याला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. 'कांगुवा' हा या वर्षातील महागड्या चित्रपटांपैकी एक असल्याचे बोलले जात आहे. भारताशिवाय 7 वेगवेगळ्या देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'कांगुवा'साठी निर्मात्यांनी ॲक्शन आणि सिनेमॅटोग्राफी सारख्या तांत्रिक विभागांसाठी हॉलिवूड तज्ञांची नियुक्ती केली आहे. तसेच या चित्रपटात सर्वात मोठा वॉर सीक्वेन्स देखील आहे, ज्यात एकूण 10 हजारांहून अधिक लोक आहेत. 'कांगुवा'ची कहाणी एस. व्यंकटेशन यांच्या 'वेल परी' या पुस्तकावर आधारित आहे.

हेही वाचा :

  1. मुंबईत सूर्या शिवकुमार स्टारर 'कांगुवा' चित्रपटाचं झालं प्रमोशन, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल
  2. रजनीकांतच्या 'वेट्टय्यान'शी संघर्ष टाळण्यासाठी सुर्यानं 'कांगुवा'ची रिलीज डेट पुढे ढकलली - kanguva Movie
  3. सूर्या आणि बॉबी देओल स्टारर 'कांगुवा'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - kanguva trailer released

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.