ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान सूरज चव्हाण आणि वैभव चौहानमध्ये झालं भांडण, व्हिडिओ व्हायरल - BIGG BOSS MARATHI - BIGG BOSS MARATHI

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी 5' हा शो आता खूप रंजक झाला आहे. या शोमध्ये कॅप्टन्सी टास्क दरम्यान सूरज चव्हाण आणि वैभव चौहानमध्ये जोरदार भांडण झालं आहे.

Bigg Boss Marathi Season 5
बिग बॉस मराठी 5 (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 12:12 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील दुसरा आठवडा सुरू आहे. आता घरात अनेकजण एकमेकांबरोबर भांडताना दिसत आहेत. कॅप्टन्सी टास्कच्या दरम्यान सूरज चव्हाण आणि वैभव चव्हाण यांच्यात वाद झाला. या दोघांमध्ये भांडणं इतकी वाढली की, इरिना रूडाकोवाला मध्यस्थी करावी लागली. 'बिग बॉस' घरातील दुसरा आठवडा वादानं सुरू झाला आहे. घरात कॅप्टन्सी टास्क दरम्यान खूप वाद होताना दिसले. हा कॅप्टन्सी टास्क बुलेट ट्रेनशी संबंधित होता. या टास्कमध्ये घरातील सदस्यांना या ट्रेनमधील जागा पटकवायची होती.

सूरज आणि वैभवचा वाद : या टास्क दरम्यान सूरज आणि वैभव यांचा हात एकमेकांना लागला, यानंतर वाद सुरू झाला. वैभव यावेळी सूरजला धमकी देत म्हणतो, "हात लावू नको नाही तर तुझं बुक्कीत मुंडकं छाटेन. यानंतर सूरज जोरदार प्रत्युत्तर देतो. त्यानंतर वैभवचा आवाज चढतो आणि यानंतर तो म्हणतो, "दम असेल तर हात लाव." हा वाद आणखी वाढतो. दोघे एकमेकांना भिडत असताना इरिना मध्ये येते आणि सूरजला शांत राहण्यास सांगते. इरिना आणि योगिता चव्हाण या सूजरला आवरतात. 'बिग बॉस मराठी 5' हा शो खूप आता मनोरंजक झाला आहे.

अंकिता प्रभू वालावलकर झाली कॅप्टन : तसेच 'बिग बॉस मराठी 5'मध्ये अंकिता प्रभू वालावलकर ही घराची कॅप्टन बनली आहे. घरामध्ये वाढत्या स्पर्धेमुळे आता अनेकजण आपला खेळ आणखी मजबूत करताना दिसत आहेत. तसेच अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर आणि वैभव चव्हाण हे सदस्य 'बिग बॉस'च्या घरात दादागिरी करत असल्याचं अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत आहेत. दरम्यान रितेश देशमुखनं शाळा घेतल्यानंतर निक्की तांबोळी ही या टाक्सदरम्यान जपून खेळताना दिसली. येत्या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी 15 जणांपैकी कोण नॉमिनेट होईल, हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'च्या पहिल्या कॅप्टन्सी बुलेट ट्रेन टास्कमध्ये होणार राडा, पाहा प्रोमो - first captaincy bullet train task
  2. ऐकलंत का 'बिग बॉस मराठी'चं नवं गाणं, 'आला रे आला... भाऊचा धक्का'? - Bigg Boss Marathi
  3. रितेश देशमुखनं केलं 'बिग बॉस मराठी सीझन 5'मध्ये 16 स्पर्धकांचं स्वागत - Bigg Boss Marathi 5

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.