ETV Bharat / entertainment

धर्मेंद्रची नात निकिता चौधरी करणार उदयपूरमध्ये लग्न - सनी बॉबी देओलची भाची

sunny bobby deol niece wedding : अभिनेता धर्मेंद्रची नात निकिता चौधरी ही उदयपूरमध्ये लग्न करणार आहे. दरम्यान या लग्नामधील काही समारंभाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

sunny bobby deol niece wedding
सनी बॉबी देओलच्या भाचीचे लग्न
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 5:24 PM IST

मुंबई - sunny bobby deol niece wedding : धर्मेंद्र यांच्या घरी पुन्हा एकदा बँड-बाजा आणि लग्नाची वरात निघताना दिसत आहे. करण देओलच्या लग्नानंतर आता आणखी एक लग्न होत आहे. हे लग्न धर्मेंद्र यांची नात आणि सनी-बॉबी देओलची भाची निकिता चौधरीचं आहे. निकिताचे लग्न उदयपूर येथे होत आहे. निकिता चौधरी ही धर्मेंद्रची मुलगी अजिताची मुलगी आहे. संपूर्ण देओल कुटुंब या लग्नासाठी पोहोचले आहेत. उदयपूरच्या सुंदर अरावली डोंगरांनी वेढलेल्या अरावली रिसॉर्टमध्ये लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. काल निकिताचा मेहंदी सोहळा होता, तर आज हळदी आणि संगीत सोहळा होत आहे. दरम्यान अभय देओलनं त्याच्या इंस्टाग्रामवर फोटोंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

सनी-बॉबी भाचीच्या हळदी समारंभाला उपस्थित : अभय देओलनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण देओल कुटुंब सेलिब्रेशनचा आनंद घेताना दिसत आहे. अभयनं कुटुंबातील नवीन वधू म्हणजेच सनी देओलची सून द्रिशा आचार्य आणि करण देओल यांची झलक दाखवली आहे. यामध्ये द्रिशा पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यानंतर अभयनं कुटुंबातील इतर सदस्यांसोबत पोझ दिली आहे. या व्हिडिओत अभय हा सनी देओलसोबत पोझ देताना दिसत आहे. याशिवाय या व्हिडिओमध्ये बॉबी देओलनं देखील पोझ दिली आहे.

सनी-बॉबीच्या भाचीचं लग्न : आज 31 जानेवारीला निकिता चौधरीचे लग्न होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा विवाह सोहळा पंजाबी रितीरिवाजानुसार पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यात 250 ते 300 पाहुणे सहभागी होणार असून त्यात परदेशी पाहुण्यांचाही समावेश आहे. हा विवाह अत्यंत खाजगी असणार आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या तलावांचे शहर उदयपूरमध्ये या वर्षातील दुसरे शाही लग्न होणार आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानचे लग्न ताज अरावली रिसोर्टमध्ये झालं. निकिता चौधरी ही धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांची मुलगी अजिता देओल चौधरीची मुलगी आहे. अजिता देओलनं यूएस स्थित दंतचिकित्सक डॉ. किरण चौधरी यांच्याशी लग्न केलंय. ती तिच्या पतीसोबत कॅलिफोर्निया, यूएसएमध्ये राहते. दोघांना प्रियांका आणि निकिता या दोन मुली आहेत. हे दोघेही त्यांच्या वडिलांप्रमाणेच डॉक्टर असल्याचं सांगण्यात येत आहेत.

हेही वाचा :

  1. आर माधवननं हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर'चं केलं कौतुक
  2. मुनावर फारुकीच्या चाहत्यांचा उत्साह नडला, बेकायदेशीर ड्रोन कॅमेरा वापरल्यामुळे गुन्हा दाखल
  3. सानिया मिर्झानं एकतर्फी घटस्फोट दिल्यानंतर पहिल्यांदाच शोएब मलिकनं सोडलं मौन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.