ETV Bharat / entertainment

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2'नं केला धमाका, 400 कोटीचा टप्पा पार - Stree 2 - STREE 2

Stree 2 Box Office : श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी अभिनीत 'स्त्री 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. या चित्रपटानं रिलीजच्या अवघ्या 7 दिवसांत जगभरात 400 कोटीचा टप्पा पार केला आहे.

Stree 2 Box Office
स्त्री 2 बॉक्स ऑफिस (Stree 2: Rajkummar-Shraddha Film Breaches Rs 400 Cr Mark at the Global Box Office in First Week (Film Poster/ ETV Bharat))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2024, 2:03 PM IST

मुंबई - Stree 2 Box Office : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2'नं बॉक्स ऑफिसवर पहिला आठवडा पूर्ण केला आहे. 15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी 'स्त्री 2'नं बॉक्स ऑफिसवर अर्धशतक पूर्ण केलं. 'स्त्री 2'नं एका आठवड्यातील बॉक्स ऑफिसवर 400 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट आता 500 कोटींच्या दिशेनं वाटचाल करत आहे. या आठवड्यातही कोणताही मोठा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालेला नाही, त्यामुळे 'स्त्री 2'चा खूप फायदा होणार आहे. आता या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करण्याची संधी आहे.

'स्त्री 2'ची 7 व्या दिवसाची कमाई : ' स्त्री 2'नं सातव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 20.4 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचं एकूण देशांतर्गत कलेक्शन 289.6 कोटींवर पोहोचले आहे. याशिवाय 7 दिवसात देशांतर्गत ग्रॉस एकूण कलेक्शन 328.50 कोटी झालंय. आता हा चित्रपट रिलीजच्या दुसऱ्या वीकेंडमध्ये 300 कोटींचा टप्पा सहज पार करेल अशी अपेक्षा केली जात आहे. या चित्रपटानं 'कल्की 2898 एडी' (277 कोटी रुपये)च्या हिंदी चित्रपटाच्या कमाईचा विक्रम मोडला आहे. हा चित्रपट मडोक फिल्म्स निर्मित असून या चित्रपटानं जगभरात एकूण कलेक्शन 401 कोटीचं केलं आहे.' स्त्री 2' चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये खूप गर्दी होत आहे. ' स्त्री 2'मध्ये श्रद्धा कपूर आणि राजकुमार व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी, विजय राज, अभिषेक बॅनर्जी, आकाश दाभाडे आणि अपारशक्ति खुराना हे कलाकार आहेत. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, वरुण धवन आणि तमन्ना भाटियानं दमदार कॅमियो केला आहे.

'स्त्री 2'ची एकूण कमाई

दिवस 1 - रु. 64.8 कोटी (सशुल्क पूर्वावलोकन)

दुसरा दिवस- 35.3 कोटी रुपये

तिसरा दिवस- 45.7 कोटी रुपये

चौथा दिवस – 58.2 कोटी रुपये

पाचवा दिवस – 38.4 कोटी रुपये

सहावा दिवस - 26.8 कोटी

सातवा दिवस - 20.4 कोटी

एकूण देशांतर्गत कलेक्शन – 289.6 कोटी (ग्रॉस कलेक्शन - 342 कोटी)

'स्त्री 2'चं जगभरातील एकूण कलेक्शन - 401 कोटी

हेही वाचा :

  1. 'द ग्रेट खली'पेक्षा उंच असलेल्या 'या' व्यक्तीनं 'स्त्री 2'मध्ये सरकटेची केली भूमिका - sunil kumar
  2. भारतीय सेलेब्सनं रक्षाबंधननिमित्त दिल्या चाहत्यांना शुभेच्छा, पाहा पोस्ट - Raksha Bandhan 2024
  3. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव अभिनीत 'स्त्री 2'नं रोवले यशाचे झेंडे, पाहा कमाईचा आकडा - STREE 2 movie

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.