ETV Bharat / entertainment

भारतीय सेलेब्सनं रक्षाबंधननिमित्त दिल्या चाहत्यांना शुभेच्छा, पाहा पोस्ट - Raksha Bandhan 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 19, 2024, 5:19 PM IST

Raksha Bandhan 2024 : बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहेत. आता हे स्टार्स आपल्या बहीण आणि भावांबरोबर फोटो शेअर करून सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांना शुभेच्छा देत ​​आहेत.

Raksha Bandhan 2024
रक्षाबंधन 2024 (instagram)

मुंबई - Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधन हा सण आज प्रत्येकजण मोठ्या जल्लोषानं साजरा करत आहे. 19 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधननिमित्त अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान विशेष प्रसंगी बॉलिवूड आणि साऊथ स्टार्सनी राखी बांधतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसंच या शुभ मुहूर्तावर 'स्त्री 2'च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर स्त्रीचा फोटो शेअर करून पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "ओ स्त्री रक्षा करना." याशिवाय त्यांनी चाहत्यांना विशेष दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस हा प्रत्येक भाऊ आणि बहिणींसाठी महत्वाचा आहे. या दिवशी सनी देओल, संजय दत्त, अक्षय कुमार, हुमा कुरेशी महेश बाबू, माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने, कपिल शर्मा, कंगना राणौत, भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक स्टार्सनं रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सनी देओल : बॉलिवूड अभिनेता सनी देओलनं त्याच्या बालपणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याची बहीण त्याला राखी बांधताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून सनीनं अनेक रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत. यावर त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं," माझ्या प्रिय बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा."

संजय दत्त : बॉलिवूडचा बाबा संजय दत्तनं बहीण प्रिया आणि नम्रताबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत संजय दत्तनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "तुम्ही दोघी माझ्या आयुष्यात असल्यानं मी खूप आनंदी आहे, तुमच्या पाठिंब्याबद्दल दोघींचे आभार, माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा."

हुमा कुरेशी : बॉलिवूडची 'महाराणी' हुमा कुरेशीनं रक्षाबंधन सण साजरा केला आहे. हुमानं तिचा अभिनेता भाऊ साकिब सलीमबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, "पार्टनर साकिब सलीम, राखी भाऊ आणि बहीण आहे."

महेश बाबू : साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि त्यांची मुलेही रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहेत. या विशेष प्रसंगी महेश बाबूची मुलगी सितारानं तिच्या भावाबरोबरचा एक बालपणीचा सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत सितारा तिच्या भावाच्या मांडीवर बसलेली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सितारानं लिहिलं, "गौतम, माझा मोठा भाऊ असल्याबद्दल धन्यवाद, ज्या बहिणींना मोठे - छोटे भाऊ आहेत त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा."

हेही वाचा :

  1. रक्षणाबंधनानिमित्त पाहा हे' सदाबहार चित्रपट, लाडका भाऊ-लाडका बहिणीमधील नाते होईल अधिक मजबूत - RAKSHA BANDHAN 2024
  2. कोलकाता बलात्कार खून प्रकरणानंतर अर्जुन कपूरनं रक्षाबंधननिमित्त पुरुषांना दिला संदेश - Raksha Bandhan 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.