ETV Bharat / entertainment

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर हॉरर कॉमेडी 'स्त्री 2'चं ॲडव्हान्स बुकिंग सुरू - Stree 2 - STREE 2

Stree 2 Advance Booking Open: राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर अभिनीत 'स्त्री 2'चं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. या चित्रपटाच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Stree 2 Advance Booking Open
स्त्री 2चं ॲडव्हान्स बुकिंग सुरु (Stree 2 Advance Booking (Photo: Film poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 2:38 PM IST

मुंबई - Stree 2 Advance Booking Open: हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2'चं ॲडव्हान्स बुकिंग सुरु झालंय. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजता चित्रपटगृहात दाखल होणार आहे. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटात पंकज त्रिपाठीही महत्त्वाची भूमिकेत दिसणार आहे. 'स्त्री'चा पहिला भाग प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता दुसऱ्या भागाबद्दलही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान शनिवारी 10 ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर प्रॉडक्शन हाऊसनं हॉरर कॉमेडीचे पोस्टर शेअर केले. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, "स्त्री 2'चं ॲडव्हान्स बुकिंग सुरू "ती स्त्री आहे , काही पण करू शकते. त्यामुळे ती एक दिवस आधी येत आहे. तुमची तिकिटे आत्ताच बुक करा."

'स्त्री 2'चं ॲडव्हान्स बुकिंग सुरु : दरम्यान सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार देशभरात 1,540 शोसाठी 4,239 पेक्षा जास्त तिकिटे विकली आहेत. आतापर्यत या चित्रपटानं रिलीजपूर्वी 24.61 लाख रुपये गोळा केले आहेत. सर्वात जास्त तिकीट विक्री ओडिशा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्ली येथे झाली आहे. रुपेरी पडद्यावर 'स्त्री 2'ची टक्कर तीन चित्रपटाबरोबर होणार आहे. यामध्ये अक्षय कुमार स्टारर 'खेल खेल में', जॉन अब्राहमचा 'वेदा ' आणि तमिळ सुपरस्टार विक्रमचा 'थंगालन' आहे. याव्यतिरिक्त, पुरी जगन्नाधचा 'डबल आय स्मार्ट' हा देखील चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.

'स्त्री 2' चित्रपटाबद्दल : पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना, राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर हे कलाकर आता प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'स्त्री' 2018मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं समीक्षक आणि प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. मध्य प्रदेशातील चंदेरी या छोट्या शहरात सेट केलेला, पहिला भाग 'स्त्री' आत्म्याभोवती फिरणारा होता. 'स्त्री 2'ची निर्मिती दिनेश विजन यांनी मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे, यात जिओ स्टुडिओच्या ज्योती देशपांडे यांचाही सहभाग आहे. या चित्रपटात वरुण धवनचा 'भेडिया' आणि अलीकडे रिलीज झालेला 'मुंज्या' यांचा देखील समावेश असणार आहे. 'स्त्री 2' चित्रपटात शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांच्याही भूमिका आहेत.

हेही वाचा :

  1. वरुण धवननं 'चिन तपाक डम डम'नंतर 'स्त्री 2'मधील गाण्याचा टीझर केला शेअर - Varun Dhawans share video
  2. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव हॉरर कॉमेडी 'स्त्री 2' होणार 'या' दिवशी प्रदर्शित - Stree 2 night shows
  3. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2'मधील 'तुम्हारे ही रहेंगे हम' गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ - stree 2 movie

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.