ETV Bharat / entertainment

महेश बाबूच्या वाढदिवसानिमित्त राजामौली चाहत्यांना देणार मोठी भेट, पाहायला मिळणार 'एसएसएमबी 29'ची पहिली झलक? - mahesh babu 48th birthday

Mahesh Babu birthday: साऊथ सुपरस्टार महेश बाबूच्या 48व्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शक एसएस राजामौली हे त्याच्या चाहत्यांना एक मोठी भेट देऊ शकतात. आज ते 'एसएसएमबी 29' या चित्रपटाबाबत काही माहिती शेअर करू शकतात.

Mahesh Babu birthday
महेश बाबूचा वाढदिवस ((IMAGE- ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 9, 2024, 4:51 PM IST

मुंबई - Mahesh Babu birthday : दिग्दर्शक एसएस राजामौली हे त्यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. 'आरआरआर'च्या यशानंतर राजामौली हे महेश बाबूबरोबर चित्रपट निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचं तात्पुरतं नाव 'एसएसएमबी 29' आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. दरम्यान, या चित्रपटाबाबत आज महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, एसएस राजामौली महेश बाबूच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवसानिमित्त एक मोठी भेट देणार असल्याचं समजत आहे. आता ही भेट काय असेल यासाठी आज रात्री 12 पर्यंत वाट पाहावी लागेल. 'एसएसएमबी 29' या चित्रपटाचा 9 ऑगस्ट रोजी छोटासा कॉन्सेप्ट व्हिडिओ प्रदर्शित केला जाऊ शकतो.

एसएस राजामौली आणि महेश बाबूचा आगामी चित्रपट : आता या दाव्यांनंतर महेश बाबूच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. सध्या महेश बाबू लाइमलाइटपासून दूर आहे आणि तो राजामौली यांच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. हा चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. या चित्रपटाबाबत कोणतेही मोठे अपडेट महेश बाबूच्या वाढदिवसालाच दिले जाईल, असा अंदाज अनेकजण लावत आहेत. महेश बाबू आणि राजामौली पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करत आहेत. 'एसएसएमबी 29'साठी सध्या कास्टिंग प्रक्रिया सुरू आहे. एसएस राजामौली यांची पृथ्वीराज यांच्याशी चर्चा सुरू असून ते या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

'गुंटूर कारम'मध्ये धमाकेदार अंदाज : महेश बाबूच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तो शेवटी 'गुंटूर कारम' या चित्रपटात रुपेरी पडद्यावर दिसला होता. या चित्रपटात श्रीलीला, रम्या आणि जगपती बाबू सारखे कलाकारही होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. 41.3 कोटींची ओपनिंग असूनही, या चित्रपटानं तिकीट खिडकीवर एकूण 126.62 कोटी रुपयांची कमाई केली. 'गुंटूर कारम' चित्रपटाकडून महेश बाबूला खूप अपेक्षा होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास यांनी केलं होतं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.