ETV Bharat / entertainment

'सोनाली कुलकर्णी ते स्वप्नील जोशी' सेलिब्रेटींच्या घरी विघ्नहर्ता झाला विराजमान - Ganeshotsav 2024 - GANESHOTSAV 2024

Ganpati Festival 2024 : सोनाली कुलकर्णी ते स्वप्नील जोशी या मराठी सेलिब्रिटींच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. या सेलिब्रिटींनी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना बाप्पाची झलक दाखवली आहे.

Ganpati Festival 2024
गणपती उत्सव 2024 (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2024, 2:20 PM IST

Updated : Sep 7, 2024, 3:04 PM IST

मुंबई Ganpati Festival 2024 : भारतातील सर्व सणांमध्ये गणेशोत्सव हा विशेष सण मानला जातो. प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला बाप्पाची पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी विशेष मानली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला, गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गेले वर्षभर सगळेजण या सणाची आतुरतेनं वाट पाहत असतात. बाप्पा हा सर्वाचा लाडका आहे. आता अनेकांच्या घरी आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी देशात एक वेगळेच वातावरण निर्माण होते. आपल्या लाडक्या गणरायाला घरी आणण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. दरम्यान मराठी कलाकारांनी देखील त्यांच्या घरी गणरायाचं स्वागत केलंय. गणेशोत्सव हा काहींच्या घरी ७ दिवसांचा असतो. याशिवाय काहीकडं दीड दिवसाचे गणपती बसत असतात. आता कुठल्या सेलेब्रिटींनी गणेशाचं कसं स्वागत केलं, याबद्दल जाणून घेऊया.

सोनाली कुलकर्णी 2024 (Etv Bharat)

सोनाली कुलकर्णी : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी विघ्नहर्ता विराजमान झाले आहेत. महिलांवरील विघ्न दूर करण्याचं सोनालीनं बाप्पाला साकडं घातलं आहे. पिंपरीमध्ये सध्या सगळीकडं गणपती बाप्पाच्या आगमनामुळं आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरवर्षीप्रमाणे सोनाली कुलकर्णी गणेशोत्सवासाठी थेट दुबईवरुन भारतात आली आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करत तिनं महिलांवरील विघ्न दूर कर, महिलांना स्वातंत्र्यानं जगता यावं, असा कायदा बनवं, असं बाप्पाला साकडं घातलं आहे. व्हिडिओमध्ये तिनं म्हटलं, "दरवेळेस अशी एखादी घटना घडते आणि सगळे रस्त्यावर येतात, बऱ्याच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतात. भावनेच्या भरात आपण व्यक्त होतो, परंतु कसलाही बदल होत नाही, ते चक्र परत फिरत राहते. म्हणून प्रत्येक वेळी न्याय मागणीसाठी मोर्चे आंदोलन करुन, न्याय मागण्याची वेळ येऊ नये. गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस सांस्कृतिक पण जपण्याचं आवाहन सोनालीनं करत गणेश उत्सवाच्या काळात धिंगाणा घालणाऱ्यांचे कान उपटले आहेत. एकूणच सोनालीच्या घरचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक आहे, असे घरच्यांनी व्यक्त होताना सांगितलं.

स्वप्नील जोशी : अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी दरवर्षीप्रमाणं यावर्षी देखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यांच्या घरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात अनेकजण स्वप्नीलला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत आहेत.

सुबोध भावे : अभिनेता सुबोध भावेच्या घरी देखील दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन झालंय. त्यानं बाप्पाबरोबरचा एक फोटो शेअर करून चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सायली संजीव : अभिनेत्री सायली संजीवच्या घरीही दरवर्षी गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात येते. ती सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून हा उत्सव साजरा करताना दिसत आहे.

रुपाली भोसले : अभिनेत्री रुपाली भोसलेनं तिच्या नव्या घरात पहिल्यांदाच गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे. आता तिनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना दिसत आहे.

अमित भानुशाली : अभिनेता अमित भानुशालीच्या घरी देखील गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. त्यानं सोशल मीडियाच्या माध्यामातून बाप्पाची झलक दाखवली आहे. याशिवाय अंकिता लोखंडे, सुयश टिळक, शशांक केतकर, सुशांत शेलार, प्रार्थना बेहेरे, शरद केळकर आणि इतर मराठी कलाकरांच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय.

Last Updated : Sep 7, 2024, 3:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.