मुंबई Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तसंच झहीर इकबाल यांचा आज मुंबईत रविवारी शुभविवाह झाला. सोनाक्षीच्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये दोघांचा विवाह नोंदणीकृत पद्धतीनं करण्यात आला. 'स्पेशल मँरेज एक्ट 1954' अन्वये या दोघांनी विवाह केला.
यावेळी सोनाक्षीचे वडील ज्येष्ठ अभिनेते तथा तृणमुल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा, त्यांची पत्नी पुनम सिन्हा उपस्थित होते.
नातेवाईक तसंच मित्रांची लग्नाला उपस्थिती : सोनाक्षीसह झहीरच्या अत्यंत जवळच्या नातेवाईक तसंच मित्रांची या सोहळ्याला उपस्थिती होती. रविवारी दुपारी हा विवाह नोंदणी पध्दतीनं करण्यात आला. तर, सायंकाळी दादर येथील अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बेस्टीयनमध्ये या विवाहानिमित्त स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या रिसेप्शन सोहळ्यात सुमारे एक हजार जणांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
सोनाक्षीनं बांधली झहीरशी लग्नगाठ : सोनाक्षी तसंच झहीरच्या लग्नाबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत सोनाक्षीनं झहीरशी लग्नगाठ बांधलीय.तिन झहीरसोबत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केलीय. विवाहाच्या पूर्वी शनिवारी सोनाक्षीच्या घरात 'रामायणा'ची पूजा करण्यात आली. तर, झहीरनं दुपारी लग्नापूर्वी मशीदीमध्ये हजेरी लावली होती. शुक्रवारी झहीरच्या घरी मेहंदीसह हळदीचा कार्यक्रम रंगला होता. लग्नानंतर सोनाक्षी हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारण्याची चर्चा होती, मात्र झहीरच्या वडिलांनी ही चर्चा फेटाळून लावली होती. तर शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील सोनाक्षीतसंच झहीरचं लग्न हिंदू किंवा मुस्लिम पध्दतीनं होणार नाही, तर स्पेशल मँरेज अँक्ट प्रमाणे होईल असं जाहीर केलं होतं.
सोनाक्षीची सोशल मीडियावर पोस्ट : लग्न झाल्यानंतर सोनाक्षीनं सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्याबाबत माहिती दिली. सात वर्षांपूर्वी 23 जून 2017 रोजी सोनाक्षी, झहीरनं एकमेकांच्या डोळ्यांत निखळ प्रेम पाहिलं. त्यानंतर आम्ही दोघांनी एक होण्याचा निर्णय घेतला. आज याच प्रेमानं आम्हाला सर्व आव्हानांवर मात करत या क्षणापर्यंत आणलं. आमच्या दोघांच्या कुटुंबीय तसंच देवाच्या आशिर्वादानं अखेर आम्ही नवरा बायको झालोय. इथून पुढे हे प्रेम, आशा इतर सर्व चांगल्या बाबी अशाच निरंतर राहो, अशी अपेक्षा सोनाक्षीनं व्यक्त केली.
'हे' वाचलंत का :