ETV Bharat / entertainment

सोनाक्षी सिन्हानं लग्नानंतर पहिल्यांदा केला रॅम्प वॉक, बार्बी डॉलचं लूक व्हायरल - Sonakshi Sinha - SONAKSHI SINHA

Sonakshi Sinha Ramp Walk after wedding: सोनाक्षी सिन्हानं इंडिया कॉउचर वीकमध्ये डिझायनर डॉली जेसाठी रॅम्प वॉक केला. सोनाक्षीनं झहीर इक्बालबरोबर लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच रॅम्प वॉक केला आहे. या शोमध्ये तिनं तिच्या लग्नाच्या दिवसाची आठवण केली.

Sonakshi Sinha Ramp Walk after wedding:
सोनाक्षी सिन्हाचा लग्नानंतर रॅम्प वॉक (सोनाक्षी सिन्हा (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 28, 2024, 3:21 PM IST

मुंबई- Sonakshi Sinha : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा दिल्लीतील इंडिया कॉउचर वीकमध्ये डिझायनर डॉली जेसाठी शोस्टॉपर बनली. लग्नानंतरचा हा तिचा पहिला रॅम्प वॉक होता. सोनाक्षीनं 23 जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्न केल्यानंतर ती खूप चर्चेत आली होती. या लग्नासाठी अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं होतं. दरम्यान तिचे इंडिया कॉउचर वीकमधील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनाक्षीचा या कार्यक्रमामधील हा लूक अनेकांना आवडत आहेत. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ पापाराझीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोनाक्षीनं लग्नानंतर पहिल्यांदा केला रॅम्प वॉक : या व्हिडिओमध्ये सोनाक्षीनं हाय स्लिट पिंक कलरचा गाऊन परिधान केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. रॅम्पवर चालताना सोनाक्षीनं फॅशन शोमध्ये 'लव्हफूल' गाण्यावर डान्स केला. यानंतर एका संवादादरम्यान सोनाक्षीनं म्हटलं, "मला खरोखर वाटते की साधी वधूची फॅशन परत येणार आहे. खरे सांगायचं झालं तर, मला माझ्या लग्नाचा पुरेपूर आनंद घेण्याचं स्वातंत्र्य होतं, कारण माझ लग्न आमच्या घरी झालं होतं, जिथे मला खूप चांगले वाटलं. मी स्वतःवर कोणताही ताण घेतला नाही. आता साधा सुंदर वधूचा हा ट्रेंड नक्कीच परत येईल असं मला वाटतं." दरम्यान सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नात जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईक हजर होते.

सोनाक्षी सिन्हाचं लग्न : सोनाक्षीनं मुंबईतील तिच्या घरी लग्न केलं. तिच्या लग्नाच्या पोशाखाबद्दल बोलताना तिनं सांगितलं, "आम्हा दोघांना ड्रेस निवडण्यासाठी पाच मिनिटे लागली, माझ्या मनात हे अगदी स्पष्ट होते, की मला लाल साडी घालायची आहे आणि लग्नासाठी मी माझ्या आईची साडी निवडली. यावर मी तिचे दागिणे देखील घातले होते. मला हे सगळं करायचं होत, म्हणूनच मला आउटफिट निवडायला जास्त वेळ लागला नाही." दरम्यान सोनाक्षीनं हा विवाह केल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी रिसेप्शन देखील आयोजित केलं होतं. यामध्ये चित्रपटसृष्टीतील अभिनेता सलमान खान, विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूरसह अनेकजण उपस्थित होते. सात वर्षे डेट केल्यानंतर सोनाक्षी आणि झहीरनं लग्न केलंय.

हेही वाचा :

  1. शत्रुघ्न सिन्हांच्या खोलीत शिरताना भीतीनं थरथरत होता झहीर इक्बाल, मुलाखतीत शेअर केला प्रपोजचा किस्सा - Zaheer Iqbal
  2. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल मुंबईहून अज्ञातस्थळी हनिमूनसाठी रवाना - SONAKSHI SINHA AND ZAHEER IQBAL
  3. सोनाक्षी सिन्हानं पोस्ट केला तिच्या लग्नातील सलमान खान, रेखासह सेलेब्रिटींचा व्हिडिओ - Sonakshi Sinha wedding

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.