ETV Bharat / entertainment

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालनं फ्रेंड्सबरोबर साजरी केली बॅचलर पार्टी - SONAKSHI SINHA AND ZAHEER IQBAL - SONAKSHI SINHA AND ZAHEER IQBAL

Sonakshi and Zaheer Bachelor Party : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी त्यांच्या बॅचलर पार्टीमधील काही फोटो शेअर केले आहेत. सध्या सोनाक्षीच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Sonakshi and Zaheer Bachelor Party
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल ((IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 3:30 PM IST

मुंबई - Sonakshi and Zaheer Bachelor Party : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची तारीख जवळ येत आहे. सोनाक्षी सिन्हा 23 जून रोजी तिचा कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्न करणार आहे. या जोडप्याच्या कुटुंबीयांनी अद्याप त्यांच्या लग्नाच्या बातम्यांना दुजोरा दिलेला नाही. आता सोनाक्षी सिन्हाच्या बॅचलर पार्टीचे फोटो समोर आले आहेत. बॅचलर पार्टीत सोनाक्षी सिन्हाचे काही फ्रेंड्स दिसत आहेत. यात हुमा कुरेशी देखील आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालनं आपापल्या बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनाक्षी सिन्हानं शेअर केले फोटो : सोनाक्षीच्या बॅचलर पार्टीमध्ये ती आणि तिचे सर्व फ्रेंड्स ब्लॅक ड्रेस कोडमध्ये दिसत आहेत. तिनं फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, '17.06. 2024' अशी तारीख नमूद केली आहे. पार्टीमध्ये तिनं डीप प्लंगिंग नेकलाइन ग्लॅमरस ड्रेस घातला आहे. याशिवाय तिच्या मेकअपबद्दल बोलायचं झालं तर तिनं विंग्ड आयलायनर आणि न्यूड लिपस्टिकसह तिचा किलर लूक पूर्ण केला आहे. सोनाक्षीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये सर्वजण सुंदर दिसत आहेत. आता सोशल मीडियावर या पार्टीमधील काही फोटो व्हायरल झाल्यानंतर सोनाक्षीच्या लग्नाच्या बातमीला उधाण आलं आहे. याआधी हनी सिंगनं देखील सोनाक्षीच्या लग्नाबद्दलची बातमी पोस्ट शेअर केली होती.

झहीर इक्बालनं शेअर केले फोटो : दुसरीकडे, झहीर इक्बालनं त्याच्या मित्रांबरोबरच्या बॅचलर पार्टीचा आनंद लुटला. त्यानं त्याच्या इन्स्टास्टोरीवर मित्रांसह बॅचलर पार्टीचे फोटोही शेअर केले आहेत. सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हानं या फोटोंवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावर त्यानं लिहिलं, "वेळेबरोबर एक समस्या आहे, आपल्याजवळ काही पर्याय नसतो." दरम्यान, सोनाक्षी सिन्हाच्या वर्कफ्रंट बोलायचं झालं तर ती शेवटी 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सीरीजमध्ये दिसली होती. आता पुढं ती 'हाऊसफुल 5' चित्रपटामध्ये अक्षय कुमारबरोबर दिसणार आहे. याशिवाय ती 'निकिता रॉय ॲन्ड द बुक ऑफ डार्कनेस' या चित्रपटात दिसेल.

हेही वाचा :

  1. अलका याज्ञिक यांची श्रवणशक्ती गेली... संगीत क्षेत्राला धक्का, गायिकेनं स्वतःच केला खुलासा - ALKA YAGNIK LOST HER HEARING
  2. 'मिर्झापूर सीझन 3'चा ट्रेलर होईल 'या' दिवशी रिलीज, पाहा तारीख - Mirzapur Season 3 Trailer
  3. प्रत्येक क्षणाला मतीगुंग करणारा 'सरफिरा'चा ट्रेलर लॉन्च, प्रेक्षकांना चक्रावून सोडण्यासाठी अक्षय कुमार सज्ज - Sarafira trailer

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.