ETV Bharat / entertainment

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल लग्नानंतर कुटुंब आणि मित्रांबरोबर दिसले डिनर डेटला - sonakshi sinha and zaheer iqbal

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 12:13 PM IST

Sonakshi sinha and zaheer iqbal : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल लग्नानंतर कुटुंब आणि मित्रांबरोबर मुंबईमधील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटला स्पॉट झाले. आता त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Sonakshi sinha and zaheer iqbal
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल (Photo - (ANI))

मुंबई - Sonakshi sinha and zaheer iqbal : सात वर्षांच्या डेटिंगनंतर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी नुकतेच कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत सिव्हिल मॅरेज केलंय. लग्नानंतर दोघांनी एक ग्रँड रिसेप्शन दिलं. यामध्ये बी-टाऊनचे अनेक स्टार्स उपस्थित होते. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाचं व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या जोडप्याच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत होता. सोनाक्षीनं सोशल मीडियावर तिचे आणि झहीरच्या लग्नामधील काही फोटो शेअर करून तिचा आनंद व्यक्त केला आहे. हा विवाह आंतरधर्मीय असल्यानं तिला सध्या अनेकजण ट्रोल करत आहेत.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल गेले डिनर डेटला : त्यामुळे तिनं आपला कमेंट बॉक्स बंद ठेवला आहे. लग्नानंतर हे जोडपे मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये कुटुंबासह डिनरसाठी पोहोचले. आता सोशल मीडियावर रेस्टॉरंटमध्ये जात असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नवविवाहित वधूनं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती खूप देखणी दिसत होती. दुसरीकडे झहीरनं यावेळी पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. पापाराझीला सोनाक्षी आणि झहीरनं पाहिल्यानंतर त्यांनी फोटोसाठी पोझ देऊन त्यांना खूश केलं. यानंतर दोघेही जेवायला गेले. यावेळी त्यांच्याबरोबर काही स्टार्सही दिसले. पूनम ढिल्लन देखील या डिनरचा एक भाग बनली.

सोनाक्षी सिन्हानं केला नोंदणीकृत विवाह : सोनाक्षी आत शिरताच झहीरच्या आई आणि वडिलांनी तिचे सुंदर पद्धतीनं स्वागत केलं. सोनाक्षीनं देखील त्यांना मिठी मारून आपले प्रेम व्यक्त केलं. या डिनर डेटला सोनाक्षीची आई पूनम सिन्हाही उपस्थित होती. सिन्हा कुटुंबाच्या जवळ असलेल्या अनु रंजननेही या डिनरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये पूनम सिन्हा, पूनम ढिल्लन आणि सोनाक्षीची बेस्ट फ्रेंड हुमा कुरेशीही दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हानं 23 जून रोजी झहीर इक्बालबरोबर नोंदणीकृत विवाह केला. यानंतर त्यांनी शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये रिसेप्शन पार्टी दिलं, यामध्ये चंकी पांडे, काजोल, रेखा, आदित्य रॉय कपूर, शर्मीन सहगल, आदिती राव हैदरी, सिद्धार्थ, अनिल कपूर, हुमा कुरेशी, रवीना टंडन यांच्यासह अनेक स्टार्स सामील झाले. सोनाक्षीचे कुटुंब या लग्नावर खूश नाही, मात्र मुलीच्या खुशीसाठी शत्रुघ्न सिन्हानं या लग्नाला हजेरी लावली. आता त्यांनी मुलगी आणि जावईबरोबर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आंतरधर्मीय विवाहामुळे सिन्हा कुटुंबीय सतत ट्रोलच्या निशाण्यावर आहे.

हेही वाचा :

  1. 'कल्की 2898 एडी'चे हक्क 'या' दोन आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मनं घेतले विकत? - Kalki 2898 OTT Release and Right
  2. बॉलिवूड अभिनेत्रींची पाहा स्ट्रीट-स्टाईलमधील फॅशन - fashion tips
  3. अक्षय कुमारच्या मार्शल आर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांना आयकर विभागात मिळाली नोकरी - Akshay Kumar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.