ETV Bharat / entertainment

शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांच्या लग्नापूर्वीच्या विधीचे झाले फोटो व्हायरल - SOBHITA DHULIPALA

शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. शोभितानं तिच्या लग्नापूर्वीच्या विधीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sobhita Dhulipala and  Naga Chaitanya
शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य (शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 21, 2024, 4:42 PM IST

मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील पॉवर पॅक कपल शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. शोभितानं आज 21 ऑक्टोबर रोजी तिच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यातील काही मनमोहक फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. शोभिता आणि नागा चैतन्य यांच्या लग्नापूर्वीची विधी 'पसुपु दंचदम'मधील फोटो आता इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. प्रत्येक फोटोमध्ये शोभिता ही एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. या फोटोच्या पोस्टमध्ये शोभितानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'गोधुमा रयै पसुपु दंचतम.' आणि आता हे सुरू झाले आहे.' शोभिता धुलिपालानं पोस्ट केलेल्या फोटोवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

शोभिता आणि नागा चैतन्य यांच्या लग्नाला सुरुवात : शोभिता धुलिपाला फोटोत केशरी हिरव्या रंगसंगतीच्या साडी आणि सोनेरी ब्लाउजमध्ये दिसत आहे. लग्नाआधीच्या सेलिब्रेशनसाठी तिनं सोन्याचे दागिने आणि हिरव्या काचेच्या बांगड्यांनी लूक पूर्ण केलं आहे. शोभितानं वेणीत बांधलेला गजरा हा तिच्या लूकला आणखी विशेष बनवत आहे. पारंपारिक साऊथ इंडियन लूक तिचा अनेकांना आता पसंत पडत असून तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका फोटोमध्ये , शोभिता कच्च्या हळदीनं भरलेले ताट घेऊन कार्यक्रमाच्या दिशेनं चालत जाताना दिसत आहे. याशिवाय या फोटोमध्ये तिच्याबरोबर काही कुटुंबातील महिला असल्याच्या दिसत आहेत.

शोभितानं फोटो केले शेअर : याशिवाय आणखी एका दुसऱ्या फोटोत ती हळद दळताना आणि कुटुंबातील सदस्यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. या फोटोमध्ये कुठेच नागा चैतन्य दिसत नाही. त्यामुळे काही चाहते नागा कुठे असल्याचा प्रश्न देखील शोभिताला करताना दिसत आहेत. यापूर्वी नागा आणि शोभितानं त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर 8 ऑगस्ट रोजी पोस्ट करून सर्वांना मोठा धक्का दिला होता. यावेळी या जोडप्याला सामंथा रुथ प्रभुच्या चाहत्यांनी खूप ट्रोल केलं होतं. आता देखील शोभितानं शेअर केलेल्या फोटोवर अनेकजण तिला ट्रोल देखील करत आहेत. नागा चैतन्यचं पहिलं लग्न सामंथा रुथ प्रभुबरोबर 2017मध्ये झालं होतं. यानंतर त्यांनी 2021मध्ये घटस्फोट घेतला.

हेही वाचा :

  1. शोभिता धुलिपालाबरोबर फोटो शेअर केल्यानंतर नागा चैतन्यनं ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी कमेंट सेक्शन केलं बंद
  2. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला साखरपुड्यानंतर चाहत्यानं केलं समांथा रुथ प्रभूला लग्नासाठी प्रपोज, व्हिडिओ व्हायरल - samantha ruth prabhu reaction
  3. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचं झाला साखरपुडा, नागार्जुननं केले फोटो शेअर - Naga and Sobhita Engaged

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.