हरिद्वार- प्रसिद्ध बॉलिवूड रॅपर यो यो हनी सिंग धार्मिक शहर हरिद्वार येथे देवीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचला. हरिद्वारच्या प्राचीन दक्षिण काली मंदिरात त्यानं निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी त्यानं कैलाशानंद गिरी यांच्याशी संवाद साधला. संतानं यो यो हनी सिंगला त्यांचा आशीर्वाद दिला. आता सोशल मीडियावर यो यो हनी सिंग धर्मगुरुंचे आशीर्वाद घेत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यासंदर्भात आचार्य महामंडलेश्वर स्वामी यांनी सांगितले की, "हनी सिंगची आपल्या धर्मावर विशेष श्रद्धा आणि आस्था आहे."
यो यो हनी सिंगनं घेतलं माता कालीचं दर्शन: यो यो हनी सिंगला हरिद्वार खूप आकर्षक वाटतं, हे त्याने यापूर्वी एका मुलाखतीमध्ये देखील सांगितलं होतं. आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी यांना भेटण्यापूर्वी तो निलेश्वर महादेव मंदिरात गेला. त्यानं इथे पूजाविधीही केली. यो यो हनी सिंगनं यावेळी काली माताचे दर्शन घेतलं. यानंतर त्यानं माता कालीची पूजा केली. दरम्यान हनी सिंगनं नवरात्रीदरम्यानच्या विशेष विधी आणि पूजा पद्धतींबाबतही सविस्तर माहिती घेतली असल्याचं कैलाशानंद गिरी महाराज यांनी सांगितलं. हनी सिंगनं धर्मनगरीचे काही फोटो आणि व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
यो यो हनी सिंगची गाणी : यावर आता चाहते त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. यो यो हनी सिंगचे खरे नाव हिरदेश 'हनी' सिंग आहे. बॉलिवूडमध्ये त्याला यो यो हनी सिंग या नावानं प्रसिद्धी मिळाली. त्यानं गायन करण्याशिवाय काही चित्रपटांमध्ये कामदेखील केलं आहे. यो यो हनी सिंगचे जगभरात चाहते आहेत. त्याची अनेक गाणी जगभरात लोकप्रिय झाली आहे. यात लुंगी डान्स', 'चार बोटल वोदका', 'धीरे धीरे', 'ब्लू आईज', 'हाय हील्स ते नच्छे', 'लव्ह डोस' या गाण्यांचा समावेश आहेत. हनी सिंगला रॅपचा बादशाह असंही म्हटलं जातं. अनेकदा तो स्टेजवर परफॉर्म करताना देखील दिसतो. आता अलीकडे त्याचा एक म्युझिक कॉन्सर्ट झाला. हा कॉन्सर्ट खूप चर्चेत आला होता.
हेही वाचा :
- चाहत्यानं पायाला हात लावताच 'यो यो हनी सिंग' चकित, म्हणाला - 'इतका म्हातारा नाही झालोय' - yo yo honey singh
- सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर मद्यधुंद हनी सिंगनं झहीर इक्बालला दिला इशारा - HONEY SINGH
- हनी सिंगनं बेस्ट फ्रेंड सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाला उपस्थित राहण्याचं दिलं आश्वासन - SONAKSHI SINHA ZAHEER IQBAL WEDDING