मुंबई - Rahat Fateh Ali Khan video: पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान सध्या चर्चेत आला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राहत फतेह अली खाननं घरीकाम करत असणाऱ्या कर्मचाऱ्याला चप्पलने मारहाण केली आहे. व्हिडिओत राहत हा एक कर्मचाऱ्याला बाटलीबाबत विचारताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्यानं आपले विधान जारी केले आहे. यामध्ये तो व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना दिसत आहे. 'बाटली कुठे आहे?' गायक राहत फतेह अली खान वाईनच्या हरवलेल्या बाटलीवरून त्याच्या घरातील कर्मचाऱ्याला विचारतो. त्यानंतर चप्पलनं मारहाण करतो.
राहत फतेह अली खाननं केली मारहाण : यानंतर मारहाण झालेल्या कर्मचारी बाटली हरवल्याचं सांगतो. याशिवाय दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये राहत फतेह अली खान या प्रकरणी माफी मागत आहे. मारहाण झालेला व्यक्तीदेखील राहत अलीला पाठिंबा देत झालेल्या प्रकरणी सारवासारव करताना दिसत आहे. राहत फतेह अली खान या व्यक्तीसोबत उभा राहून संपूर्ण प्रकरणावर चर्चा करत आहे. त्याचा हा व्हिडीओ एका व्यक्तीनं शेअर केला आहे. या व्हिडिओवर त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''काहीही असो, ज्याप्रकारे त्याला मारहाण केली, हे समर्थनीय ठरू शकत नाही. तो तुझा शिष्य आहे. कितीही फॉलोअर्स असले तरी जोडे मारणे योग्य नाही.''
-
'Bottle Kahan Hai?' Singer Rahat Fateh Ali Khan beats his house staff member over one missing bottle of Wine.
— Manie Singh ☬ 🇮🇳 (@manieofficial) January 27, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Money & fame can be earned through hard work, but ethical values cannot be bought.#RahatFatehAliKhan #Rahat pic.twitter.com/PozZm3tqz6
">'Bottle Kahan Hai?' Singer Rahat Fateh Ali Khan beats his house staff member over one missing bottle of Wine.
— Manie Singh ☬ 🇮🇳 (@manieofficial) January 27, 2024
Money & fame can be earned through hard work, but ethical values cannot be bought.#RahatFatehAliKhan #Rahat pic.twitter.com/PozZm3tqz6'Bottle Kahan Hai?' Singer Rahat Fateh Ali Khan beats his house staff member over one missing bottle of Wine.
— Manie Singh ☬ 🇮🇳 (@manieofficial) January 27, 2024
Money & fame can be earned through hard work, but ethical values cannot be bought.#RahatFatehAliKhan #Rahat pic.twitter.com/PozZm3tqz6
राहत फतेह अली खानचा व्हिडिओ व्हायरल : या व्हिडिओमध्ये मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यानं बाटली हरवल्याचे सांगितलं. ते पाणी पवित्र असल्याचं म्हटलं आहे. पुढं तो व्यक्ती सांगत आहे की, ''ज्या लोकांनी हा व्हिडिओ पसरवला आहे, ते माझ्या 'उस्ताद'ची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत.'' याशिवाय राहत फतेह अली खाननं देखील त्याला या व्हिडिओमध्ये माफी मागितली आहे. दरम्यान आता अनेकजण हा व्हिडिओ पाहून राहत फतेह अली खानला ट्रोल करत आहेत. काहीजण त्याला कठोर आणि राक्षस असल्याचं म्हणत आहेत.
हेही वाचा :