ETV Bharat / entertainment

Ed Sheeran : ग्लोबल सिंगर एड शिरीन कॉन्सर्टनंतर मुंबई विमानतळावर झाला स्पॉट ; व्हिडिओ व्हायरल - Singer ed sheeran at mumbai airport

Ed Sheeran : एड शिरीनचा मुंबई विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो विमानतळाच्या आत प्रवेश करताना दिसत आहे.

Ed Sheeran
एड शिरीन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 2:11 PM IST

मुंबई - Ed Sheeran : मुंबईतील कॉन्सर्टममध्ये पहिल्यांदाच पंजाबीमध्ये गाऊन चाहत्यांना चकित केल्यानंतर ग्लोबल सिंगर एड शिरीन त्याच्या पुढच्या प्रवासाला निघाला आहे. रविवारी मुंबईतील विमानतळावर एड शिरीन हा स्पॉट झाला. पापाराझींनी काढलेल्या व्हिडिओमध्ये एड शिरीन विमानतळाच्या एंट्री गेटकडे चालताना दिसत आहे. यावेळी त्यानं ब्लॅक अँड व्हाइट कॅज्युअल आउटफिट घातला होता. त्यानंतर त्यानं विमातळावर जमलेल्या चाहत्यांना शेकहॅन्ड करून निरोप घेतला. एड शिरीन भारतात आल्यापासून चर्चेत आहे. मुंबईतील कॉन्सर्ट हा शिरीनच्या आशिया आणि युरोप दौऱ्याचा भाग होता.

एड शिरीनचा मुंबई विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल : एड शिरीननं मुंबईतील कॉन्सर्टमध्ये पंजाबी गायक दिलजीत दोसांझबरोबर स्टेज शेअर केला होता. व्हायरल क्लिपमध्ये महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर एड आणि दिलजीत स्टेजवर परफॉर्मन्स देताना दिसत आहे. एडनं दिलजीतबरोबर पंजाबी चार्ट-बस्टिंग ट्रॅक 'लव्हर' गाणं गायलं. दिलजीतनं शनिवारी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक छोटी क्लिप शेअर केली आहे. यात त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'एड शिरीन भाई पहिल्यांदा पंजाबीमध्ये गातोय. चक दिया गया.'' याशिवाय एडीनं देखील या कॉन्सर्टमधील व्हिडिओ शेअर करत लिहिले. ''आज रात्री मुंबईत मला पहिल्यांदा दिलजीत दोसांझबरोबर पंजाबीमध्ये गाण्याची संधी मिळाली. माझा भारतामधील हा अविश्वसनीय काळ आहे, पुढे आणखी काही असेल.''

एड शिरीनसाठी भव्य पार्टी : शिरीनच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या सेलिब्रिटींमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीची थक थक गर्ल माधुरी दीक्षित, दिग्दर्शक-कोरियोग्राफर फराह खान आणि अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत यांनी देखील हजेरी लावली होती. याआधी एड शिरीन हा अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींना भेटला होता. काही दिवसापूर्वी तो शाहरुख खान, गौरी खान , फराह खान, अरमान मलिक आयुष्मान खुराना आणि इतर सेलिब्रिटींनी भेटला होता. या भेटीचेदेखील सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. याशिवाय मुंबईत फराह खान एडसाठी एक भव्य पार्टीचेदेखील आयोजन केलं होत.

हेही वाचा :

  1. Shah Rukh Khan on Airport : शाहरुख खानचा शाही अंदाज, विमानतळावरील नवा लूक चर्चेत!
  2. Ed Sheeran And Diljit Dosanjh: एड शिरीननं दिलजीत दोसांझबरोबर स्टेजवर गायलं पंजाबी गाणं, चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का
  3. Kiara Advani :'योद्धा'मध्ये सिद्धार्थ मल्होत्राला पाहिल्यानंतर कियारा अडवाणी भावूक, चाहत्यांच्या व्हिडिओवर दिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.