मुंबई - Sidharth Malhotra : अमेरिकेत राहणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्राच्या एका चाहतीनं खळबळजनक दावा केला आहे. सिद्धार्थच्या फॅन पेजनं 50 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप या चाहतीनं केला आहे. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी कियारा अडवाणी यांच्या नावानं ही फसवणूक करण्यात आली असल्याचं आता समजत आहे. मीनू वासुदेवा नावाच्या एका चाहतीनं म्हटलं की, सिद्धार्थ स्वतःही या फॅन पेजला फॉलो करतो. दरम्यान या फॅन पेजवरून तिची 50 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचं अमेरिकेत राहणाऱ्या मीनूनं सांगितलं. ज्या व्यक्तींनी या फॅनची फसवणूक केली आहे, त्यांचे नावे अलिजा आणि हुस्ना परवीन अशी आहेत. या दोघांनी सिद्धार्थचा जीव कियारा अडवाणीमुळे धोक्यात असल्याच्या खोट्या कथा रचून फसवणूक केली असल्याचं उघड झालं आहे.
@sidmalhotra@advani_kiara@dharmamovies@apoorvamehta18@manishmalhotra@delhipolice@missmalini@instantbolly@rudrani_rudz@anchorhimanshi7@hindustantimes@zoomtv@zeetv@NayandipRakshit@KomalNahta@vinilmathew@jubindesai@pin1012@MassZaveri@filmygyan@filmymantra pic.twitter.com/GxdGRMd2q4
— minoo💃🏽🎵 (@desi_girl334) June 30, 2024
सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहतीला बसला 50 लाखाचा झटका : यानंतर मीनूनं पुढं म्हटलं की, "अलिजानं मला, सिद्धार्थला वाचवण्यासाठी मदत करण्यास सांगितलं. यानंतर घोटाळेबाजांनी मला दीपक दुबे आणि काही इतर लोकांशी बोलायला लावलं, हे लोक सिद्धार्थची पीआर टीम असल्याचा दावा करत होते. मी त्याला दर आठवड्याला पैसे दिले जेणेकरून मी सिद्धार्थशी बोलू शकेल. सिद्धार्थच्या संबंधित माहितीसाठी, माझ्याकडून दर आठवड्याला ते 1,000 रुपये आकारत असत. पण नंतर मला समजले की मी ज्या व्यक्तीशी मी बोलत आहे, तो सिद्धार्थ नसून दुसरा कोणीतरी आहे." दरम्यान या घटनेमुळे चाहत्यांमध्ये संताप पसरला आहे.
@sidmalhotra@advani_kiara@dharmamovies@apoorvamehta18@manishmalhotra@delhipolice@missmalini@instantbolly@rudrani_rudz@anchorhimanshi7@hindustantimes@zoomtv@zeetv@NayandipRakshit@KomalNahta@vinilmathew@jubindesai@pin1012@MassZaveri@filmygyan@filmymantra pic.twitter.com/ALiTEGA4Yz
— minoo💃🏽🎵 (@desi_girl334) June 30, 2024
सिद्धार्थ मल्होत्राला महिला चाहतीनं केली विनंती : मीनू वासुदेवनं तिच्या एक्स अकाऊंटवर अनेक स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत, यात ती अभिनेत्याबरोबर फेक चॅट करताना दिसत आहे. मीनूनं दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, "सिद्धार्थनं या गंभीर विषयावर बोलावं. त्याच्या फॅन क्लबचे ॲडमिन आणि मध्यस्थ अभिनेत्याबद्दल निरर्थक कथा रचून निष्पाप चाहत्यांची कशी फसवणूक करत आहेत, याचा शोध घ्यावा. याशिवाय शक्य असल्यास गेलेले पैसे परत करावेत आणि पैसे न दिल्यास , सिड मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू त्यांना शिक्षा देशील." अशी मागणी मीनूनं केली आहे.
@sidmalhotra@advani_kiara@dharmamovies@apoorvamehta18@manishmalhotra@delhipolice@missmalini@instantbolly@rudrani_rudz@anchorhimanshi7@hindustantimes@zoomtv@zeetv@NayandipRakshit@KomalNahta@vinilmathew@jubindesai@pin1012@MassZaveri@filmygyan@filmymantra
— minoo💃🏽🎵 (@desi_girl334) June 30, 2024
#34 pic.twitter.com/wFHdfWJmxY
@sidmalhotra@advani_kiara@dharmamovies@apoorvamehta18@manishmalhotra@delhipolice@missmalini@instantbolly@rudrani_rudz@anchorhimanshi7@hindustantimes@zoomtv@zeetv@NayandipRakshit@KomalNahta@vinilmathew@jubindesai@pin1012@MassZaveri@filmygyan@filmymantra
— minoo💃🏽🎵 (@desi_girl334) June 30, 2024
#26 pic.twitter.com/iPF0mK3lqr
हेही वाचा :