जामनगर - Anant and Radhika pre wedding event : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं रविवारी जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग कार्यक्रमातील कियारा अडवाणीबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये हे जोडपे खूपच सुंदर दिसत आहे. फिल्म इंडस्ट्रीची बेबो करीना कपूर खाननंदेखील प्री-वेडिंग इव्हेंटमधील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये नताशा पूनावाला आणि बहीण करिश्मा कपूर तिच्याबरोबर पोझ देताना दिसत आहेत. याशिवाय दुसऱ्या एका फोटोमध्ये ती सैफ अली खानबरोबर दिसत आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं प्री-वेडिंग इव्हेंट : सिद्धार्थनं इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'काल रात्रीपासून'. याशिवाय त्यानं यावर हार्ट इमोटिकॉनदेखील शेअर केला आहे. फोटोत कियारा चंदेरी रंगाच्या लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत आहे. तर सिद्धार्थनं लाल रंगाचा कुर्ता-पायजमा घातला आहे. तर दुसरीकडे करीना कपूरनं काळ्या रंगाची साडी नेसली आहे. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नातील फोटोमध्ये बेबो मजा करताना दिसत आहे. या भव्य लग्नातील सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
या कार्यक्रमात सेलेब्सनं लावली हजेरी : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग इव्हेंट शुक्रवारी जामनगरमध्ये सुरू झाला. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंतच्या प्री-वेडिंग इव्हेंटला उपस्थित राहण्यासाठी जगभरातून पाहुणे जामनगर, गुजरात येथे उपस्थित राहिले. शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर यांसारख्या बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते एमएस धोनी, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर यांसारख्या प्रसिद्ध क्रीडा जगतातील, विविध क्षेत्रातील दिग्गजांनी या भव्य कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. याशिवाय या कार्यक्रमात हॉलिवूड गायक रिहानादेखील उपस्थित राहिले. रिहानाचेदेखील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ती खूप धमाल करताना दिसत आहे. आता नुकताचं रिहानाचा जान्हवी कपूरबरोबरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये या दोघीही डान्स करताना दिसत आहेत.
हेही वाचा :