मुंबई : 'पुष्पा 2'च्या भव्य यशादरम्यान, साऊथ अभिनेता सिद्धार्थनं चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमावर आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडेच त्यानं एका मुलाखतीत पुष्पा स्टारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. सिद्धार्थनं 'पुष्पा 2: द रुल'च्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी पाटणा येथे जमलेल्या गर्दीबद्दल भाष्य केल असून याची तुलना जेसीबी कन्स्ट्रक्शन साइटशी केली आहे. सिद्धार्थचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मंगळवारी फिल्म इंडस्ट्री ट्रॅकर मनोबाला विजयबालननं एक्सवर सिद्धार्थचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'धक्कादायक सिद्धार्थनं 'पुष्पा 2'च्या पाटणा कार्यक्रमाची तुलना जेसीबी कन्स्ट्रक्शन साइटला पाहण्यासाठी येणाऱ्या गर्दीशी केली.'
सिद्धार्थनं साधला अल्लू अर्जुनवर निशाना : सिद्धार्थनं मुलाखत म्हटलं, "आपल्या देशात जेसीबी कन्स्ट्रक्शन साइटवरही गर्दी होते. त्यामुळे बिहारमध्ये अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होणे, ही काही नवीन गोष्ट नाही. त्यांनी असे कार्यक्रम आयोजित केले तर नक्कीच गर्दी होईल. भारतात गर्दी म्हणजे गुणवत्ता नाही. हे खरे असेल तर सर्व राजकीय पक्ष जिंकले पाहिजे, हे सर्व बिर्याणी आणि क्वार्टर बाटल्यांच्या पॅकेटसाठी आहे." सिद्धार्थच्या या विधानमुळे अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. आता अनेक यूजर्स सिद्धार्थवर आरोप करत असून त्याला खडेबोल सुनावत आहे. तर काहींनी त्याला देशातील सर्वात मोठ्या स्टार्सला वाईट न बोलण्याचा सल्ला देत आहे.
SHOCKING: Siddharth compares Pushpa 2 patna event with crowd which comes to watch JCB construction👷🚧🏗️ pic.twitter.com/BMyVUo3sWa
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 10, 2024
सिद्धार्थचा 'मिस यू' चित्रपट कधी होईल रिलीज : रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थचा हा व्हिडिओ त्याचा आगामी चित्रपट 'मिस यू'च्या प्रमोशनदरम्यानचा आहे. सिद्धार्थच्या या चित्रपटाची टक्कर 'पुष्पा 2'बरोबर होणार होती. मात्र या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'मिस यू'ची तारीख पुढं ढकलली आहे. आता हा चित्रपट 13 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेवटी तो 'इंडियन 2'मध्ये दिसला होता. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अभिनेता कमल हासन दिसला होता. याशिवाय सिद्धार्थकडे आणखी काही प्रोजेक्ट्स आहेत.
हेही वाचा :
- आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ लग्नानंतर पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर झाले स्पॉट, व्हिडिओ व्हायरल... - Aditi Rao Hydari and Siddharth
- अदिती राव हैदरीनं बॉयफ्रेंड सिद्धार्थबरोबर बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल - Aditi tie knot with Siddharth
- 'हीरामंडी' प्रीमियरमध्ये अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ दिसले एकत्र, व्हिडिओ व्हायरल - ADITI RAO HYDARI AND SIDDHARTH