मुंबई - साऊथ अभिनेत्री नयनतारा आणि धनुष यांच्यातील वाद आता मोठा झाला आहे. तिनं 3 पानांचे एक खुले पत्र लिहिलंय, यात नयनतारानं सरळ धनुषवर निशाणा साधत त्याला फटकारलं आहे. या पत्रामुळे आता साऊथ इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. 'नानुम राउडी धान' चित्रपटातील एका गाण्याच्या 3 सेकंदाच्या क्लिपसाठी धनुषनं 10 कोटी रुपयांचा दावा ठोकल्याचा आरोप नयनतारानं केला आहे. नयनताराच्या या लढाईत तिला सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेक साऊथ अभिनेत्री समर्थन देत आहेत. नयनताराच्या केलेल्या आरोपानुसार, चित्रपटाचा निर्माता असलेल्या धनुषनं तिला गाण्याची क्लिप वापरण्याची परवानगी दिली नाही, ही क्लिप सोशल मीडियावर देखील उपलब्ध आहेत. दरम्यान नयनताराच्या या खुल्या पत्रावर आता साऊथ स्टार्सच्या प्रतिक्रियाही सध्या येत आहेत.
नयनताराच्या पोस्टवर साऊथ स्टार्सनी दिल्या प्रतिक्रिया : आता नयनतारा आणि धनुषच्या वादात अभिनेत्री श्रुती हासन आणि ऐश्वर्या राजेश यांच्यासह अनेकानां तमिळ अभिनेत्रींनी खुल्या पत्रावर प्रतिक्रिया देऊन तिला समर्थन दिले आहेत. शनिवारी 16 नोव्हेंब रोजी नयनतारानं धनुषवर आरोप केल्यानंतर दोघेही सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले होते. दरम्यान श्रुतीनं धनुषबरोबर 3 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र तरीही श्रुतीनं नयनताराची पोस्ट लाईक केली. या लढतीत नयनताराला ऐश्वर्या लक्ष्मी, पृथ्वी तिरुवोथु, ऐश्वर्या राजेश, अनुपमा परमेश्वरन आणि मंजिमा मोहन यांनी पाठिंबा दिला आहे.
नयनताराचा माहितीपट : नयनतारा तिच्या पोस्टमध्ये ती फिल्मी दुनियेत कशी आली आणि तिनं स्वत:च्या बळावर इंडस्ट्रीत नाव कसे कमावले हे सांगितले आहे. आजकाल नयनतारा तिच्या 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल' या माहितीपटामुळे चर्चेत आहे. हा माहितीपट 18 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तिच्या माहितीपटात तिनं धनुषच्या निर्मिती अंतर्गत बनवलेल्या 'नानुम राउडी धान'ची क्लिप वापरली होती. या चित्रपटात नयनतारा प्रमुख भूमिकेत दिसली होती, तर तिचे पती विघ्नेश शिवन हे दिग्दर्शक होते. यानंतरही धनुषनं नयनताराला तिच्या डॉक्युमेंटरीमध्ये त्याच्या चित्रपटातील 3 सेकंदची क्लिप वापरण्याची परवानगी दिली नाही. याउलट तिच्यावर 10 कोटींचा खटलाही दाखल केला. याप्रकरणी आता नयनतारानं नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :