ETV Bharat / entertainment

श्रुती हासन आणि शंतनु हजारिका यांच्या ब्रेकअपच्या चर्चा, एकमेंकांना केलं अनफॉलो - Shruti Haasan and Santanu Hazarika - SHRUTI HAASAN AND SANTANU HAZARIKA

Shruti Haasan BREAK UP ? : साऊथ चित्रपटसृष्टीतील आणि बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेली अभिनेत्री श्रुती हासनच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या आहेत. तिनं बॉयफ्रेंडला अनफॉलो केल्यामुळे चर्चांना जास्त बळकटी मिळतेय.

Shruti Haasan BREAK UP
श्रुती हासन ब्रेकअप
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 5:29 PM IST

मुंबई - Shruti Haasan BREAK UP ? : साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्री श्रुती हासन अचानक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. एका रिपोर्ट्नुसार, श्रुती हासननं बॉयफ्रेंड शंतनु हजारिकाबरोबर ब्रेकअप केलं आहे. श्रुती आणि शंतनूच्या ब्रेकअपच्या बातम्या या सोशल मीडियावर प्रचंड वेगानं पसरत आहेत. याशिवाय दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याचं आता बोललं जात आहे. अलीकडेच श्रुतीनं तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर तिनं लिहिलं होतं, "हा एक विलक्षण प्रवास होता, मी माझ्याबद्दल आणि इतर लोकांबद्दल खूप काही जाणून घेतलं." आता या ब्रेकअपच्या बातमीवर श्रुती आणि शंतनू यांनी अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाही.

श्रुती हासन आणि शंतनु हजारिकाचं ब्रेकअप ? : श्रुती आणि शंतनू बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रेमी युगुल गेल्या 2 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांना अनेकदा पार्ट्या, व्हेकेशन आणि मुंबईत स्पॉट केलं गेलं आहे. दरम्यान शंतनूबद्दल सांगायचं झालं तर तो एक प्रसिद्ध डूडल आणि व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. रफ्तार, दिव्य आणि ऋत्विज यांसारख्या अनेक सेलिब्रिटींबरोबर त्यानं काम केलं आहे. त्याचे इंस्टाग्रामवर 1 लाख 24 हजार फॉलोअर्स आहेत. याआधी सोशल मीडिया स्टार ओरी उर्फ ओरहान अवत्रामानी यानं दोघांच्या लग्न झाल्याची अफवा पसरवली होती, त्यानंतर श्रुतीनं या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. तिनं लग्न केलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

श्रुती हासनचं वर्कफ्रंट : श्रुती हासन आणि तिचा बॉयफ्रेंड शंतनू हजारिका हे ग्लॅमरच्या दुनियेतील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल आहेत. श्रुतीनेही शंतनूबरोबरचे अपलोड केलेले रोमँटिक फोटो हटवले आहेत. श्रुती आणि शंतनू जवळपास 4 वर्षे एकमेकांना डेट करत होते. दरम्यान श्रुतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं बॉलिवूडमध्ये 'लक' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिच्याबरोबर इमरान खान हा दिसला होता. आता पुढे ती 'डकेत' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 'सालार 2'मध्ये प्रभासबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसेल.

हेही वाचा :

  1. इलियाना डिक्रूझने दिली मायकेल डोलनशी लग्न केल्याची व एक मुलगाही असल्याची कबूली - Ileana Dcruz
  2. 'कल्की एडी 2898'च्या निर्मात्यांनी शेअर केले नवीन पोस्टर, आज होईल रिलीज तारखेची मोठी घोषणा - kalki 2898 ad
  3. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'रोशन सिंग सोढी बेपत्ता, जेनिफर बन्सीवालनं दिली प्रतिक्रिया... - Gurucharan Singh Missing

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.