मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीचे 'शोमॅन' राज कपूर यांची 100 वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने राज कपूर यांच्या चित्रपटांचे चाहते असलेल्या सिनेप्रेमींसाठी काल शुक्रवारी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये चित्रपटसृष्टीतील नामवंत सेलिब्रिटींनी सहभाग घेतला. दरम्यान, भारताचे दिग्गज चित्रपट निर्माता राज कपूर यांच्या 100 व्या जयंती निमित्त साजरे होत असलेल्या काही मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यासाठी आज मुंबईत चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे.
हा खास प्रसंग साजरा करण्यासाठी, काल शुक्रवारी दिग्गज शोमॅनच्या कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन राज कपूरच्या सिनेकर्तृत्वाला उजाळा दिला. या कार्यक्रमादरम्यान, संपूर्ण कपूर कुटुंबानं एकत्र एक संस्मरणीय फोटोसाठी पोज दिली.
#WATCH | Mahasrashtra: Marking 100 years of Raj Kapoor, the 'greatest showman' of Indian cinema, his family members gather at a film festival organised in his honour in Mumbai.
— ANI (@ANI) December 13, 2024
Randhir Kapoor, Rima Jain, Karisma Kapoor, Kareena Kapoor Khan - along with her husband Saif Ali… pic.twitter.com/8NgbApvOQu
राज कपूर यांचा मुलगा रणधीर कपूर, मुलगी रीमा जैन, सून बबिता आणि नीतू कपूरपासून ते नातू रणबीर कपूर आणि नातवंड करीना कपूर, करिश्मा कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनीपर्यंत सर्वांनी आपल्या हटके स्टाईलमध्ये या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कपूर कुटुंबाला एकत्र पाहून चाहते खूप आनंदी दिसत आहेत.
या कार्यक्रमात केवळ कपूर कुटुंबीयच नाही तर चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारही सहभागी झाले होते. प्रेम चोप्रा, जितेंद्र, रेखा, कार्तिक आर्यन, विकी कौशल, महेश भट्ट, संजय लीला भन्साळी, रितेश देशमुख, हुमा कुरेशी आणि शर्मन जोशी यांच्यासह अनेक फिल्म सेलेब्रिटींनी या कार्यक्रमात भाग घेतला.
आर.के. फिल्म्स, फिल्म हेरिटेज फाउंडेशन आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफडीसी ) यांच्या संयुक्त विद्यमानं राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीचा भव्य सोहळा साजरा होत आहे. या महोत्सवात 40 शहरे आणि 135 चित्रपटगृहांमध्ये राज कपूरचे दहा आयकॉनिक चित्रपट दाखवले जाणार आहेत.
राज कपूर यांचे सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि जवळपास चार दशकं त्यांनी केलेल्या सर्जनशील कामाचं, प्रतिभेचं दर्शन घडवण्याचा हेतू या महोत्सवामागे आहे. यामध्ये राज कपूर यांच्या आग (1948), बरसात (1949), श्री 420 (1955), आवारा (1951), जगते रहो (1956), संगम (1964), जिस देश में गंगा बहती है (1960), मेरा नाम जोकर (1970), बॉबी (1973) आणि राम तेरी गंगा मैली (1985) सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.