ETV Bharat / entertainment

चित्रपटगृहात 'शोले' पुन्हा हाऊसफुल्ल, जावेद अख्तर यांनी सांगितल्या अविस्मरणीय आठवणी - Sholay special screening - SHOLAY SPECIAL SCREENING

फिल्म हेरिटेज फाउंडेशननं (FHF) कुलाबामधील रिगल सिनेमामध्ये शोलेचं शनिवारी खास स्क्रिनिंग आयोजित केलं होतं. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी दुपारपासून रांगा लावल्याचं दिसून आलं.

Sholay special screening
शोले स्पेशल स्क्रिनिंग (Source- ETV Bharat)
author img

By PTI

Published : Sep 1, 2024, 9:02 AM IST

Updated : Sep 1, 2024, 9:18 AM IST

मुंबई- शोलेमधील संवाद आणि पात्रांनी प्रत्येक भारतीयांच्या मनावर गारुड केलं आहे. त्यामुळे आजही शोलेतील संवाद असो की गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. मायापुरीत शोले चित्रपटाच्या चाहत्यांसाठी शनिवारी ( 31 ऑगस्ट) खास स्क्रीनिंग करण्यात आलं. तेव्हा चाहत्यांचा प्रचंड उत्साह आणि आनंद पाहून लक्षात येत होतं, प्रेक्षक आणि शोले म्हणजे, "ये दोस्ती हम नही छोडेंगे.."

स्क्रिनिंग सुरू होण्यापूर्वी सलीम-जावेद हे चित्रपटगृहात आले. तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्या वाजवून त्यांचे स्वागत केले. सलीम-जावेद यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत शोलेच्या आठवण्या सांगितल्या. ७९ वर्षीय गीतकार आणि पटकथाकार अख्तर यांनी चाहत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अख्तर यांनी सांगितलं, " सामान्यत: असं लेखकांबाबत घडत नाही. शोले एवढा लोकप्रिय ठरेल, याची कल्पना केली नव्हती."

ते चित्रपटाचं सौंदर्य ठरलं - जावेद अख्तर यांनी शोलेच्या आठवणी सांगताना म्हटलं," मी आणि सलीम साहेब शोलेची पटकथा लिहित होतो. तेव्हा आम्हाला खूप लोकप्रिय चित्रपट करत असल्याची कल्पना आली नव्हती. तसेच चित्रपटात खूप कलाकार असल्याची माहितीदेखील नव्हती. जसंजसं पटकथा विकसित झाली तसं पुढे बदलत गेले. चित्रपटात खूप पात्र असल्यानं अनेक स्टार होते. खूप स्टार असलेला चित्रपट करण्याचं कोणतही नियोजन नव्हतं. मात्र, ते चित्रपटाचं सौंदर्य ठरलं आहे. शोलेच्या यशामागे त्या चित्रपटावरील आणि त्यामधील विविध भूमिकांवरील चाहत्यांचे प्रेम आहे," असे पटकथाकार अख्तर यांनी सांगितलं.

नक्की काही तरी जादू- पुढे अख्तर म्हणाले, "मला वाटत नाही, गॉडफादर, गॉन विद द वाईंड वगळता लोकांना कोणत्याही चित्रपटातील भूमिका लक्षात असतील. मात्र, शोलेतील पात्र हे ५० वर्षानंतही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यामागं नक्की काही तरी जादू आहे. ही जादू फक्त आम्ही केली नाही. तर ती आमची आणि प्रेक्षकांमधील जादू आहे. या चित्रपटाचं कौतुक केल्याबद्दल आम्ही भारतामधील आणि विदेशामधील प्रेक्षकांचे आभारी आहोत." जावेद अख्तर यांनी एफएचएफचे संस्थापक शिवेंद्र सिंग डुंगरपूरचे आभार मानले.

प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान- काही वृद्ध जोडपे हातात हात घालून चित्रपट पाहण्यासाठी आले होते. आमचा सर्वात आवडीचा चित्रपट पाहण्याकरिता आम्ही खूप उत्सुक आहोत, असं या जोडप्यानं सांगितलं. १ हजारांहून अधिक सीट असलेल्या चित्रपटगृहात चाहत्यांनी गर्दी केली. शोले चित्रपटाच्या चाहत्यांमध्ये अत्यंत उत्साह दिसून आला. क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जाणारा शोले पुन्हा एकदा चित्रपट पाहताना प्रेक्षक आनंदित झाले. एका प्रेक्षकानं सांगितलं, मी कालचक्र फिरवून परतल्याचा अनुभव घेत आहे. व्हिटेंज प्रिंट ही मला शालेय जीवनातील आठवण करून देत आहे. प्रेक्षक खूप उत्साही आहेत. हा खरोखर अविस्मरणीय अनुभव आहे. रिगल चित्रपटगृहात सर्व वयोगटातील प्रेक्षक होते. अनेक वर्षानंतरही शोलेमधील जादू अनुभवताना त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि समाधान दिसत होते.

प्रोजेक्शनिस्ट मोहम्मद अस्लम फाकिह यांनी शोलेचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, "त्यावेळी आपल्याकडं ७० मिमीचा स्क्रीन नव्हता. तेव्हा आम्ही सामान्यत: रिगलमध्ये इंग्रजी चित्रपट दाखवायचो. मी कुर्लामध्ये शोले पाहिला होता. आज रिगलमध्ये शोले पाहताना चाहत्यांनी प्रत्येक क्षणाला आनंद अनुभवला, हे पाहून आनंद झाला.

हा चित्रपट अनेक वर्षे टिकला आहे. कदाचित अनेक वर्षे टिकणार आहे. आजही हा चित्रपट कालबाह्य वाटत नाही. त्यामुळे चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अभिवादन!-गीतकार आणि पटकथाकार-जावेद अख्तर

स्पेशल स्क्रीनिंगला निर्मात्यांसह विविध कलाकार उपस्थित-स्पेशल स्क्रीनिंगसाठी जावेद अख्तर यांची कन्या झोया अख्तरदेखील उपस्थित राहिली. तिनंही शोलेच्या जुन्या प्रिंटचे पुनर्जतन केल्याबद्दल डुंगरपूर यांचे आभार मानले. स्क्रिनिंगचे आयोजन हे फिल्म हेरिटेज फाउंडेशनसह सलमान खान प्रोडक्शन हाऊस सलमान खान फिल्मस, फरहान अख्तर, रितेश सिधवानीज एक्सेल मीडिया अँड एन्टरटेनमेंट आणि झोया अख्तर आणि रीमा कागटीज टायगर बेबी यांनी केलं होतं. स्पेशल स्क्रिनिंगला चित्रपट निर्माता विक्रमादित्य मोटवाने, विधू विनोद चोप्रा, निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेता कुनाल रॉय कपूर उपस्थित होते.

सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटापैकी एक चित्रपट- शोलेचे संवाद आणि पटकथा हे सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी लिहिलेलं आहे. त्या काळात सलीम-जावेद हो जोडी प्रसिद्ध होती. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी शोलेचे दिग्दर्शन केले आहे. शोले म्हणजे बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटापैकी एक चित्रपट आहे. चित्रपटात जय-वीरू म्हणजे धर्मेंद्र-अमिताभ यांच्या दोस्तीचं एक समीकरण दिसून येते. तर खलनायकाची भूमिका साकारणारा अमजद खान यांनी गब्बर सिंगची एक वेगळीच दहशत निर्माण केली. गब्बर सिंगचे प्रत्येक डायलॉग हे प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. तर डाकूचा बदला घेण्याकरिता सूडानं पेटलेला ठाकूर हा संजीव कपूर यांनी आपल्या खास शैलीत वठविला आहे. हेमा मालिनी, जया भादुरी, ए. के. हंगल, असरानी, इफ्तेकार, जगदीप, केश्तो मुखर्जी, लीला मिश्रा, मॅक मोहन आणि विजू खोटे यांच्या भूमिकादेखील अविस्मरणीय ठरल्या आहेत.

Last Updated : Sep 1, 2024, 9:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.