ETV Bharat / entertainment

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात झालेला 'खुला' काय आहे? - क्रिकेट कर्णधार शोएब मलिक

Shoaib Malik Marriage : आतापर्यंत सानिया मिर्झाचा पार्टनर असलेल्या पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिकनं पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत लग्न केलं आहे. यानंतर सानिया मिर्झा आणि शोएबमध्ये घटस्फोट झाला आहे का? असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे. याला सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी दुजोरा दिला आहे.

Shoaib Malik Marriage
Shoaib Malik Marriage
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 7:07 AM IST

Updated : Jan 21, 2024, 7:14 AM IST

नवी दिल्ली Shoaib Malik Marriage : पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार शोएब मलिकनं शनिवारी जाहीर केलं की, त्यानं पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री सना जावेद सोबत दुसरं लग्न केलंय. दरम्यान, सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांचं वक्तव्य समोर आले आहे. त्यात हे 'खुला' असल्याचं म्हटलं होतं. वास्तविक 'खुला' हा मुस्लिम महिलेचा पतीला एकतर्फी घटस्फोट देण्याचा अधिकार आहे. यात नात्याला कंटाळलेली मुस्लिम महिला लग्नाच्या वेळी ठरलेल्या हुंड्याच्या रकमेच्या बदल्यात किंवा तिला काही मालमत्ता देऊन 'खुला' मागू शकते. खुलानंतर सानिया आणि शोएब हे दोघंही वेगळे झाले.

काय आहे 'खुला'? : 'खुला' ही इस्लामिक शरियत कायद्यातील तरतूद आहे. यामध्ये मुस्लिम महिलांना त्यांच्या पतींना एकतर्फी घटस्फोट घेण्याचा अधिकार मिळतो. 'खुला' अंतर्गत मुस्लिम महिला तिच्या पतीला घटस्फोटपत्र पाठवून घटस्फोट देऊ शकते. तिला तिच्या पती किंवा इतर कोणाच्या परवानगीची गरज नाही. 'खुला' देण्यासाठी कोणतंही कारण देणं आवश्यक नाही. स्त्री तिच्या इच्छेनुसार ते देऊ शकते. एकदा 'खुला' दिलं की घटस्फोट होतो. त्यानंतर पती-पत्नी दोघंही वेगळे होतात. मुस्लिम महिलेला दिलेला हा एक विशेष अधिकार आहे. याद्वारे ती स्वतःच्या इच्छेनं विवाह संपवू शकते.

  • - Alhamdullilah ♥️

    "And We created you in pairs" وَخَلَقْنَاكُمْ أَزْوَاجًا pic.twitter.com/nPzKYYvTcV

    — Shoaib Malik 🇵🇰 (@realshoaibmalik) January 20, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कसा करता येतो 'खुला'? : 'खुला' देण्यासाठी, पत्नीनं एक "तलाकनामा" लिहिलेला असतो. यात ती तिच्या पतीला दिलेला घटस्फोट जाहीर करते. हा तलाकनामा लिखित स्वरुपात असतो. त्यावर पत्नीची स्वाक्षरी असते. यासोबतच साक्ष देणाऱ्या दोन साक्षीदारांच्या सह्याही असतात. एकदा हा लिखित पतीनं स्वीकारला की लागू होतो. जर स्वीकारला नाही तर पत्नीला काझीकडं जावं लागतं. या लिखित दस्तऐवजाद्वारे पत्नी कायदेशीररित्या पतीपासून विभक्त होते.

सोशल मिडीयावर केला फोटो शेअर : यापूर्वी एप्रिल 2010 मध्ये सानिया मिर्झासोबत लग्न करणाऱ्या शोएब मलिकनं सोशल मीडियावर आपल्या नव्या पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यात लिहिलं होतं 'अलहमदुलिल्लाह, आम्ही जोडपे झालो आहोत.' क्रिकेटरचा पाच वर्षांचा मुलगा इझान त्याच्या आईसोबत सानिया मिर्झासोबत राहतो. 2022 पासून शोएब आणि सानियाच्या नात्यातील दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. अलीकडच्या वर्षांत हे जोडपं क्वचितच एकत्र दिसलं होतं. मलिकनं इन्स्टाग्रामवर सानिया मिर्झाला अनफॉलो केल्यानंतर दोघांमध्ये तणावाचे संबंध झाल्याची पुन्हा चर्चा सुरू झाली होती.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचं लग्न : सानिया मिर्झानं शोएब मलिकसोबतचे फोटो तिच्या इंस्टाग्रामवरुन हटवले होते. 8 जानेवारी रोजी एक पोस्ट शेअर करताना तिनं लिहिलं होतं की, "जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनाची शांती भंग करते, तेव्हा ती गोष्ट जाऊ द्या." सानिया आणि शोएबचं लग्न 2010 मध्ये झालं होतं. या जोडप्याला 2018 मध्ये मुलगा झाला. या जोडप्यानं त्याचं नाव इझान ठेवलं होतं. अलीकडंच इझाननं जलतरण स्पर्धेत पदक जिंकलं. तेव्हा हे जोडपं एकत्र दिसलं होतं. इझानच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला होता.

हेही वाचा :

  1. सानिया मिर्झाशी घटस्फोटाच्या अफवा असताना शोएब मलिकनं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी केलं लग्न

Last Updated : Jan 21, 2024, 7:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.