ETV Bharat / entertainment

'देवरा पार्ट 1'मधील 'धीरे धीरे' गाणं पाहिल्यानंतर जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडनं दिली 'ही' प्रतिक्रिया - devara part 1 - DEVARA PART 1

Shikhar Pahariya: जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्ट 1'मधील 'धीरे धीरे' रिलीज करण्यात आलं आहे. आता या गाण्यावर जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियानं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

devara part 1
देवरा पार्ट 1 ((ANI- @janhvikapoor Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 6, 2024, 11:30 AM IST

मुंबई - Shikhar Pahariya: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर 'देवरा: पार्ट 1'मधून तेलुगूत पदार्पणासाठी सज्ज आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर ज्युनियर एनटीआर दिसणार आहे. दरम्यान 5 ऑगस्ट रोजी या चित्रपटामधील दुसरं गाणं 'धीरे धीरे' रिलीज झालं, आता या गाण्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. या रोमँटिक ट्रॅकनं रिलीज होताच चाहत्यांची मनं जिंकली आहेत. या गाण्यात जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआर यांची धमाकेदार केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दरम्यान जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियानं दोघांमधील केमिस्ट्रीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जान्हवी कपूरनं शेअर केलं 'देवरा पार्ट 1'मधील गाणं : जान्हवी कपूरनं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर या गाण्याची झलक शेअर केली आहे. हे गाणं शेअर करताना जान्हवीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "फाइनली घरी परतल्यासारखं वाटतंय, 'देवरा'चं सेकंड सिंगल आता पूर्णपणे तुमचं आहे." यानंतर जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहारियानं देखील एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'व्वा व्वा व्वा 'मास." याशिवाय त्यानं दोन इमोजी देखील जोडले आहेत. शिखरनं जान्हवीचं खूप कौतुक केलंय. 'धीरे धीरे' हे गाणं अनिरुद्ध रविचंदरनं संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याला शिल्पा रावनं गायलं आहे. याशिवाय 'धीरे धीरे' गाण्याचे बोल कौसर मुनीर यांनी लिहिले आहेत. आता हे गाणं अनेकांना आवडत आहे.

वर्कफ्रंट : कोरटाला शिवा दिग्दर्शित 'देवरा पार्ट 1' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 27 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय चित्रपटाच्या दुसऱ्या भागात खलनायकासाठी बॉबी देओलची निवड करण्यात आली आहे. जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्ट 1'मध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स असणार आहेत. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान जान्हवी आणि ज्युनियर एनटीआरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ज्युनियर एनटीआर 'वॉर 2' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तर जान्हवी ही 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' 'तख्त' आणि 'नानी 33' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर स्टारर 'देवरा पार्ट 1'मधील 'धीरे धीरे' गाणं रिलीजसाठी सज्ज - devera part 1
  2. जान्हवी कपूरनं सोशल मीडियावर कौतुकासाठी पैसे देण्याच्या दाव्यांवर केलं विधान - Janhvi Kapoor opens up
  3. जान्हवी कपूर स्टारर 'उलझ'चा पहिला आकर्षक ट्रॅक 'शौकन'चा टीझर रिलीज, पाहा व्हिडिओ - JANHVI KAPOOR

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.