ETV Bharat / entertainment

शरद पोंक्षे - स्नेह पोंक्षे लवकरच घेऊन येणार 'बंजारा' चित्रपट - movie Banjara

Movie Banjara : शरद पोंक्षे आणि त्यांचा सुपुत्र स्नेह पोंक्षे या बापलेकाच्या जोडीनं 'बंजारा' या चित्रपटाची घोषणा केली. यामधून स्नेह पोंक्षे दिग्दर्शनात उतरत आहे. या चित्रपटाच्या इतर कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

movie Banjara
'बंजारा' चित्रपट (Banjara Poster)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 4:00 PM IST

मुंबई - Movie Banjara :

काही दिवसांपूर्वीच शरद पोंक्षे आणि त्यांचा सुपुत्र स्नेह पोंक्षे यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. बाप लेकाची ही जोडी प्रेक्षकांसाठी काय जबरदस्त घेऊन येणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होतेच. मात्र यावरील पडदा आता उठला असून 'बंजारा' असं या चित्रपटाचं नाव आहे. आयुष्याच्या प्रवासावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचं, पहिली झलक पाहून दिसतंय. चित्रपटाचं नाव जरी जाहीर झालं असलं तरी या चित्रपटात कोणकोण कलाकार झळकणार, हे जाणून घेण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, मोरया प्रॉडक्शन्स आणि वि. एस. प्रॉडक्शन्स सादर करीत असलेल्या या चित्रपटाचं शरद पोंक्षे आणि रोहिणी विजयसिंह राजे पटवर्धन निर्माते आहेत. या चित्रपटाचं बरेचसे चित्रीकरण हे सिक्कीममध्ये झालं आहे.

मराठी कलाक्षेत्रातील एक नामवंत नाव म्हणजे शरद पोंक्षे. नाटक, मालिका, चित्रपट या कलेच्या विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर शरद पोंक्षे 'बंजारा'चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. वैशिष्टय म्हणजे या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांचा सुपुत्र स्नेह पोंक्षे करणार आहे. दिग्दर्शक म्हणून स्नेहचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट आणि मनोरंजनात्मक पाहायला मिळणार, हे नक्की !

याबद्दल निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, ‘’लेकाच्या चित्रपटाच्या माध्यमातून मी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. यापेक्षा वेगळा आनंद काही असूच शकत नाही. स्नेहच्या मनात 'बंजारा'चा विचार आल्यापासून ते चित्रीकरणापर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे. विषय वेगळा आहे. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे. खरंतर आयुष्यात प्रत्येक मनुष्य हा 'बंजारा' असतोच. चित्रपट पाहाताना याचा अनुभव येईलच.''

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, " वडिलांबरोबर पहिल्यांदाच काम करत आहे. त्यांच्या अनुभवाची मला खूपच मदत झाली. कुठे जायचंय, यापेक्षा तिथं जायचा प्रवास आनंददायी हवा, परंतु याच आनंदाला आपण बऱ्याचदा मुकतो. याचं महत्व अधोरेखित करणारा 'बंजारा' आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल.''

हेही वाचा -

  1. अक्षय कुमार आणि राधिका मदन स्टारर आगामी चित्रपट 'सरफिरा'मधील दुसरं गाणं रिलीज - AKSHAY KUMAR AND RADHIKA MADAN
  2. 'कल्की 2898 एडी' पाहण्यासाठी एसएस राजामौलीनं सामान्य प्रेक्षकांसह लावली हजेरी, व्हिडिओ व्हायरल - SS Rajamouli
  3. यूके ते हैदराबादपर्यंत 'कल्की 2898 एडी' रिलीजसह प्रभासचा ज्वर वाढला - Kalki 2898 AD Release

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.