ETV Bharat / entertainment

19 वर्षांनंतर परतणार 'शक्तिमान', मुकेश खन्नाची घोषणा... - ACTOR MUKESH KHANNA

'शक्तिमान' हा शो आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मीडियावर अभिनेता मुकेश खन्नाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

shaktimaan
शक्तिमान ('शक्तिमान' (@iammukeshkhanna Instagram-Canva))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 12, 2024, 1:40 PM IST

मुंबई - 90च्या दशकातील 'शक्तिमान' 19 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच निर्मात्यानं 'शक्तिमान'चा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये 'शक्तिमान' शाळेतील मुलांबरोबर दिसत आहे. याशिवाय मुकेश खन्ना यांची एक मुलाखतही समोर आली आहे, यात तो शोच्या सीक्वेलबद्दल बोलताना दिसत आहे.आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत मुकेश खन्ना देशाच्या शहीद जवानांच्या स्मरणार्थ गाताना दिसत आहे. दरम्यान काही मुले देखील त्याच्याबरोबर गात आहेत. व्हिडिओत 'शक्तिमान' देशाच्या क्रांतिकारी शूर सैनिकांबद्दल मुलांबरोबर कोडी सोडवत आहेत.

'शक्तिमान' पुन्हा येईल : अलीकडेच एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्नानं 'शक्तिमान' री-लाँच होण्याबद्दल सांगितलं होतं. 'शक्तिमान'च्या पुनरागमनावर मुकेश खन्ना म्हटलं होतं, "मला वाटतं की हा माझ्या वैयक्तिक मनातील पोशाख आहे. हे पात्र माझ्या आतून आलेलं आहे. मी, भीष्म पितामह, चांगले केले कारण ते माझ्या आतून आले होते. मी 'शक्तिमान' चांगले केले कारण ते माझ्या आतून आले आहे." यानंतर त्यानं पुढं म्हटलं, 'मी कोणतीही रोमँटिक भूमिका करू शकत नाही, कारण ती माझ्यातून बाहेर येणार नाही. मी खलनायकाची भूमिका करू शकत नाही कारण ती माझ्यातून बाहेर पडणार नाही. अभिनय म्हणजे आत्मविश्वास. मी शूटिंग करत असताना कॅमेरा विसरतो. पुन्हा 'शक्तिमान' बनल्याचा मला जास्त आनंद आहे."

मुकेश खन्नाची मुलाखत : एएनआयला दिलेल्या मुकेश खन्ना आणखी सांगितलं होतं," मी माझी जबाबदारी पूर्ण करत आहे, जी मी 1997 मध्ये सुरू केली होती आणि 2005 पर्यंत चालू होती. मला असं वाटतं की 2027 मध्ये माझं काम लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे कारण आजची पिढी आंधळी आहे. त्यांना थांबवून श्वास घ्यायला सांगावं लागेल." आपल्या मुलाखतीदरम्यान मुकेश खन्नानं सांगितलं की, 'शक्तिमान'च्या पुनरागमनासाठी कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्याला साईन केलेलं नाही. आता सोशल मीडियावर 'शक्तिमान'च्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रिया देऊन आपला आनंद व्यक्त करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.