ETV Bharat / entertainment

अजय देवगण स्टारर 'शैतान' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज ; पाहा व्हिडिओ - अजय देवगण आणि आर माधवन

Shaitaan trailer released : अजय देवगण अभिनीत 'शैतान' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूप भिती निर्माण करणारा आहे.

Shaitaan trailer released
शैतान ट्रेलर रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 3:42 PM IST

मुंबई - Shaitaan trailer released : अभिनेता अजय देवगण, आर. माधवन आणि साऊथ अभिनेत्री ज्योतिका स्टारर 'शैतान' हा लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट काळ्या जादूवर आधारित आहे. दरम्यान आज 22 फेब्रुवारी रोजी 'शैतान' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटाची खूप दिवसांपासून चर्चा होती. याशिवाय या चित्रपटामधील 'खुशियां बटोर लो' या गाण्याचे देखील टीझर आणि काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. 'शैतान' चित्रपटामध्ये आर . माधवन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर खूप थरारक आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'शैतान'चा ट्रेलर तुम्हाला हादरवेल : ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर 'शैतान'चा ट्रेलर 2.26 मिनिटांचा आहे. या ट्रेलरची सुरुवात खूप दमदार आहे. अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणारी साउथ अभिनेत्री ज्योतिका फोनवर घाबरून बोलते, "सर, कृपया माझ्या घरी लवकर या, तो माझ्या मुलीला मारून टाकेल", त्यानंतर ट्रेलरची सुरुवात भीतीदायक आणि धक्कादायक दृश्यांसह होते. अजय देवगणच्या घरात आर. माधवन आपल्या मुलीचे नाव घेऊन 15 मिनिटे राहण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नंतर तो त्याच्या घरीच राहतो. यानंतर तो अजय आणि ज्योतिकाच्या मुलीला वशमध्ये करतो. अजय आणि ज्योतिकाची मुलगी कधी स्वतःला दुखवते तर कधी आई-वडिलांना मारते. हे सर्व ती आर. ती माधवनच्या सल्ल्यानं करत असते. ते पाहून अजय-ज्योतिकाच्या पायाखालची जमीन सरकते. यानंतर अजय आणि ज्योतिका हे आर. माधवनच्या गडद सावलीतून आपल्या मुलीला मुक्त करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. अखेर अजय-ज्योतिकाची मुलगी आर. माधवनच्या गडद सावलीतून बाहेर येईल, हे चित्रपटातच पाहिल्यावरच माहिती होईल. हा 2.26 मिनिटांचा ट्रेलर तुम्हाला नक्कीच चित्रपट पाहण्यास भाग पाडेल.

'शैतान' चित्रपटाबद्दल : या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. हा चित्रपट 8 मार्चला प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक आहेत. अजय देवगणच्या 'तान्हाजी', 'दृश्यम' आणि 'रेड' सारख्या चित्रपटांचे निर्माते आता 'शैतान' हा हॉरर ड्रामा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत.

हेही वाचा :

  1. भूषण कुमार आणि दिव्या खोसला यांच्या घटस्फोटावर झाला खुलासा ; वाचा बातमी
  2. करण जोहर आणि वरुण धवननं 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटाची केली घोषणा
  3. शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा, ईडीने बजावले समन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.