ETV Bharat / entertainment

विराट कोहलीची नक्कल करताना शाहिद कपूरचा मजेदार व्हिडिओ व्हायरल - शाहिद कपूरचा मजेदार व्हिडिओ व्हायरल

Shahid Kapoor : अभिनेता शाहिद कपूरनं इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यानं विराट कोहलीची नक्कल केली आहे.

Shahid Kapoor
शाहिद कपूर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 1:34 PM IST

मुंबई - Shahid Kapoor : शाहिद कपूर सध्या त्याच्या सायन्स-फिक्शन रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट उद्या 9 फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहिदबरोबर अभिनेत्री क्रिती सेनॉन दिसणार आहे. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटातून पहिल्यांदाचं शाहिद आणि क्रिती रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. शाहिद कपूर त्याच्या आगामी चित्रपटाच्या रिलीजपूर्वी इंस्टाग्रामवर विनोदी रील पोस्ट करून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. त्याचा हा रील क्रिकेटर विराट कोहलीशी संबंधित आहे.

शाहिद कपूरनं शेअर केला मजेदार व्हिडिओ : शाहिद कपूरनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो क्रिकेटच्या बॅटसह घरात इकडे-तिकडे फिरताना दिसतो. याशिवाय विराट कोहलीनं फिटनेसवर दिलेल्या मुलाखतीला शाहिद लिप सिंक करत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, ''प्रमोशन संपल्यानंतरच्या भावना.'' शाहिद कपूरचा हा मजेदार व्हिडिओ अनेकांना खूप आवडत आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. काहीजण या व्हिडिओच्या कमेंट विभागात फायर इमोजी आणि हसण्याचे इमोजी पोस्ट करत आहेत. यापूर्वी देखील शाहिदनं एक मजेशीर रील इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्याचा हा रील वाढत्या वजनबद्दल होता. सोशल मीडियावर त्याचा हा रील देखील खूप व्हायरल झाला होता.

शाहिद कपूरचे आगामी चित्रपट : 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटात क्रिती सेनॉन रोबोटच्या भूमिकेत दिसणार असून शाहिद रोबोटिक तज्ञाच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधन शाह यांनी केलंय. शाहिद हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनशिवाय डिंपल कपाडिया, राकेश बेदी, राजेश कुमार, आशीष वर्मा, धर्मेंद्र, अर्जुन पांचल आणि इतर कलाकार दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. दीपिका पदुकोणने विमानतळावर दाखवली, 'वेड्या बहिणीची वेडी माया'
  2. 'ट्वेल्थ फेल' स्टार विक्रांत मॅसीच्या घरी हलला पाळणा
  3. हृषिकेश मुखर्जींच्या 'बावर्ची'चा होणार रिमेक, अनुश्री मेहतावर दिग्दर्शनाची जबाबदारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.