ETV Bharat / entertainment

मीरा कपूरबरोबर रोमँटिक डिनर डेट दरम्यान पापाराझींना पाहून शाहिद कपूर झाला संतप्त - shahid kapoor - SHAHID KAPOOR

Shahid Kapoor : शाहिद आणि मीरा राजपूतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शाहिद हा पापाराझीवर नाराज होताना दिसत आहे.

Shahid Kapoor
शाहिद कपूर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 23, 2024, 3:41 PM IST

मुंबई - Shahid Kapoor : हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता शाहिद कपूर सध्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'च्या यशाचा आनंद लुटत आहे. गेल्या सोमवारी म्हणजेच 22 एप्रिल रोजी तो पत्नी मीरा कपूरबरोबर रोमँटिक डिनर डेटवर गेला होता. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पापाराझींनी या जोडप्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. शाहिद जेव्हा मीराबरोबर रेस्टॉरंटमधून बाहेर पडत होता, तेव्हा त्याला पापाराझीनं घेरलं, यावर तो नाराज झाला. आता पापाराझीनं त्याच्या इंस्टाग्रामवर शाहिद कपूरचा लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत संतप्त झालेल्या शाहिद असे म्हणताना ऐकू येते, "मित्रांनो, तुम्ही हे सर्व थांबवू शकता का? "

शाहिद आणि मीरा राजपूत कपूरचा व्हिडिओ व्हायरल : आता शाहिद कपूरच्या व्हायरल व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. या व्हिडिओवर एका चाहत्यानं लिहिलं, "शाहिदची पत्नी स्वत:ला स्टार समजते." दुसऱ्या एकानं लिहिलं, "कपूर कुटुंबातील बेस्ट कपल." आणखी एकानं लिहिलं, "शाहिद हा आता खूप वेगळा दिसत आहे." याशिवाय अनेकजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. व्हिडिओमध्ये शाहिदनं काळ्या रंगाची टी-शर्ट आणि जीन्स घातली आहे. याशिवाय मीरानं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना हे जोडपे हात धरलेले दिसत आहे. शाहिद आणि मीरा दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.अनेकदा हे जोडपे आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

वर्कफ्रंट : शाहिद कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो शेवटी क्रिती सेनॉनबरोबर 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' मध्ये दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. शाहिद कपूर रोशन एंड्रयूजच्या ॲक्शन थ्रिलर 'देवा'मध्ये पूजा हेगडेबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय पुढं तो दिग्दर्शिक आदित्य निंबाळकर यांच्या 'बुल' चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, अमर बुटाला आणि गरिमा मेहता आहेत. सध्या या चित्रपटाबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

हेही वाचा :

  1. हृतिक रोशनचा डान्स बघून मनोज वाजपेयीच्या नृत्य करण्याच्या स्वप्नाचा झाला चुराडा - MANOJ BAJPAYEE
  2. श्रद्धा कपूरनं ज्वेलरी शॉपमध्ये सेल्सवुमन म्हणून केलं काम, व्हिडिओ व्हायरल - Shraddha Kapoor
  3. सलमान खान वाय प्लस सिक्युरिटीमध्ये करणार 'सिकंदर'ची शूटिंग - salman khan y plus security team

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.