ETV Bharat / entertainment

व्हॅलेंटाईन वीकमध्ये शाहिद कपूर क्रिती सेनॉन स्टारर 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'वर स्पेशल ऑफर - शाहिद कपूर क्रिती सेनॉन

TBMAUJ : 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्हॅलेंटाईन वीकमध्ये रसिकांना स्पेशल ऑफर दिली आहे. काय आहे ही ऑफर जाणून घेण्यासाठी वाचा.

TBMAUJ
तेरी बातों में ऐसा उल्झा जिया
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 1:51 PM IST

मुंबई -TBMAUJ : अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन स्टारर रोमँटिक चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' व्हॅलेंटाईन वीकमध्ये 9 फेब्रुवारी रोजी रिलीज झाला. आता अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जात आहेत. 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. व्हॅलेंटाईन वीकमध्ये 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'च्या निर्मात्यांनी रसिकांसाठी एक मोठी ऑफर आणली आहे. 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'चे निर्माते आता एका चित्रपटाच्या तिकिटासह एक तिकीट पूर्णपणे मोफत देणार आहेत.

व्हॅलेंटाईन वीकमधील स्पेशल ऑफर : या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही जोडीदाराबरोबर रोमँटिक चित्रपटचा आनंद घेऊ शकता. मडोक फिल्म्सनं 12 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स वीकमधील 'हग डे'च्या दिवशी रसिकांसाठी एक मोठी ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, ''टू हार्ट्स, वन टिकट, बाय वन गेट वन टिकट, डील फॉर यू अँन्ड युअर व्हॅलेंटाईन.'' या पोस्टमध्ये निर्मात्यांनी असंही सांगितलं की, ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे, म्हणजेच 14 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर एकाच तिकिटावर हा चित्रपट पाहू शकता.

TBMAUJ
तेरी बातों में ऐसा उल्झा जिया

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'चं कलेक्शन : शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन स्टारर 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये जगभरात 55.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'नं पहिल्या दिवशी 6.7 कोटीची कमाई केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या शनिवारी या चित्रपटानं 9.65 कोटी, तिसऱ्या दिवशी 10.75 कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटानं आतापर्यत देशांतर्गत 27.1 कोटीचं कलेक्शन केलं आहे. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉननं पहिल्यांदाच एकत्र काम रुपेरी पडद्यावर केलं आहे.

हेही वाचा :

  1. कियारा अडवाणीने ब्लॅक गाउनमध्ये पती सिद्धार्थ मल्होत्रासह केले घायाळ
  2. आदित्य नारायणनं लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान चाहत्याचा फोन हिसकावून दिला फेकून
  3. एका व्यक्तीच्या कानशिलात लगावली, पण एल्विश यादवला ना खंत ना खेद!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.