ETV Bharat / entertainment

मीरा राजपूतचा आपण 'दुसरा पती' असल्याचं शाहिद कपूरचा दावा, चाहते संभ्रमात - SHAHID KAPOOR CRYPTIC POST

विमान प्रवासातील एक मजेशीर क्षण शेअर करताना शाहिद कपूरनं आपण पत्नी मीरा राजपूतचा 'दुसरा पती' असल्याचं घोषित केलंय. शाहिदनं असं का म्हटलंय जाणून घ्या.

Shahid Kapoor -Mira Rajput
मीरा राजपूत आणि शाहिद कपूर (hahid Kapoor with wife Mira Rajput (Photo: ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 5, 2024, 6:06 PM IST

मुंबई -शाहिद कपूरनं अलीकडेच त्याच्या आयुष्यातील एक हलका-फुलका क्षण चाहत्यांसाठी शेअर केला आहे. याला मजेशीर शीर्षक दिल्यामुळं अनेकांना धक्का बसला. विमान प्रवासातील पत्नी मीरा राजपूतचा एक व्हिडिओ शेअर करताना त्यानं स्वतःला मीराचा दुसरा पती म्हणून उल्लेख केल्यानं त्याची मिश्किल बाजू प्रकर्षानं पुढं आली आहे.

शाहिद कपूरनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो आणि त्याची पत्नी मीरा राजपूत विमानातून प्रवास करताना दिसतात. यावेळी त्यानं पत्नीचा व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये ती आपला मोबाईल फोन पाहण्यात मग्न झालेली दिसत असून तिचं इतरत्र कुठंही लक्ष नाही. अशावेळी आपल्या चेहऱ्यावर मजेशीर भाव आणत शाहिदनं व्हिडिओच्या मागे 1974 च्या 'आज की ताजा खबर' या क्लासिक चित्रपटामधील किशोर कुमारच्या 'मुझे मेरी बीवी से बचाओ' हे गाणं जोडलं आहे. या आयकॉनिक गाण्यासह या व्हिडिओच्या शीर्षकामध्ये त्यानं "मी दुसरा नवरा आहे," असं लिहिलं आहे.

3 ऑक्टोबर रोजी, शाहिद कपूरनं मीराबरोबरच्या त्याच्या शांत पर्वतीय प्रवासाची एक झलक दाखवली आहे. या फोटोला त्यानं "शुभ सकाळ" असं कॅप्शन दिलं होतं. आरामदायी ग्रे रंगाचं टी-शर्ट, स्वेटपॅण्ट आणि काळ्या रंगाचे हाफ जॅकेट घातलेल्या, शाहिदनं कॅमेराकडे हसत पोज दिली आहे.

व्यावसायिक आघाडीवर, शाहिद कपूर शेवटचा अमित जोशी आणि आराधना साह दिग्दर्शित 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'मध्ये दिसला होता. या पुढे तो 'देवा' या चित्रपटात पूजा हेगडे हिच्याबरोबर काम करणार आहे. यामध्ये तो पोलिसाच्या ङभूमिकेत झळकेल. शाहीद निर्माते साजिद नाडियादवाला आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्याबरोबरही तो एक चित्रपट करत आहे. या चित्रपटात त्याच्या बरोबर तृप्ती दिमरी सामील होणार असल्याचं सांगण्यात येतं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.