मुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा आगामी चित्रपट 'देवा'चं नवीन वर्षाच्या निमित्तानं पोस्टर रिलीज झालं होतं. आता ही शाहिदच्या चाहत्यांसाठी मोठी भेट आहे. या पोस्टरसह आता चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल देखील खुलासा करण्यात आला आहे. शाहिदनं त्याच्या इंस्टाग्राम फीडवर पोस्टर शेअर करत या पोस्टवर लिहिलं, 'लॉक आणि लोड 'देवा', 31 जानेवारी 2025 रोजी सिनेमागृहात भेटू!' पोस्टरमध्ये शाहिद हा सिगारेट ओढताना दिसत आहे. आता त्याच्या या लूकवरून असं वाटत आहे, की तो 'कबीर सिंग' आणि 'उडता पंजाब'मधील पात्रासारखा या चित्रपटामध्ये दिसणार आहे. शाहिद कपूरनं 'देवा'चं नवीन पोस्टर रिलीज करून चाहत्यांना एक जबरदस्त भेट दिली आहे.
शाहिद कपूरचा आगामी चित्रपट 'देवा'ची रिलीज डेट आली समोर : रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन यांची देखील झलक दिसत आहे. यश चोप्राच्या 'दीवार' पोस्टरमधील अमिताभ बच्चन यांची जबरदस्त पोझ असलेल्या लूकनं सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 'देवा' चित्रपटाचं पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये आणखीनच उत्साह वाढला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची खास भूमिका असेल का, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. याशिवाय आता रिलीज झालेल्या, या पोस्टवर शाहिदचे चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. पोस्टरवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, 'या पोस्टरनं मला हादरवले आहे! जर ही पहिली झलक असेल तर मी चित्रपटाची वाट पाहू शकत नाही.' दुसऱ्यानं लिहिलं, 'भारी पोस्टर आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'जेव्हाही शाहिद पोस्टर रिलीज करतो, तेव्हा माझे हार्ट वेगानं धडधडू लागते, 'देवा'ची वाट पाहू शकत नाही.' या चित्रपटाचं पोस्टर आता अनेकांना आवडत आहेत.
'देवा'मधील शाहिद कपूरची भूमिका असणार कडक : शाहिद कपूरनं झी स्टुडिओच्या 'देवा' या चित्रपटात एका खतरनाक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये पूजा हेगडे पत्रकाराच्या भूमिकेत दिसेल. कुब्बरा सैत आणि पावेल गुलाटी चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत असणार आहे. रोशन एंड्रयूजचा 'देवा' सुरुवातीला 14 फेब्रुवारी 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार होता, मात्र काही कारणास्तव त्याची प्रदर्शनाची डेट पुढे ढकलण्यात आली. गेल्या वर्षी शाहिद कपूरनं सांगितलं होतं की 'देवा'मधील त्याची भूमिका थरारक असेल. दरम्यान शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'मध्ये क्रिती सेनॉनबरोबर दिसला होता. आता पुढं तो 'लवयापा' आणि 'बुल' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :