ETV Bharat / entertainment

शहीद दिवसानिमित्त पाहता येतील असे अलीकडेच प्रदर्शित झालेले आणि आगामी देशभक्तीपर चित्रपट - Shaheed Diwas 2024 - SHAHEED DIWAS 2024

Shaheed Diwas 2024 : 23 मार्ज रोजी शहीद दिन साजरा केला जाते. या दिवशी क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या दिनानिमित्त पाहता येतील अशा काही देशभक्तीपर चित्रपटाची तुम्हाला यादी देत आहोत.

Shaheed Diwas 2024
शहीद दिवस 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 5:32 PM IST

मुंबई- Shaheed Diwas 2024 : आज 23 मार्ज रोजी शहीद दिन आहे. देशाला स्वतंत्र करण्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आजच्या दिवशी इंग्रजांनी फाशी दिली होती. हा दिवस हुतात्मा दिन म्हणून ओळखला जातो. शहीद दिनानिमित्त या क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ आम्ही तुमच्यासाठी काही देशभक्तीपर चित्रपट घेऊन आलो आहोत , जे तुम्ही आजच्या दिवसाला पाहू शकता.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

ऐ वतन मेरे वतन : अभिनेत्री सारा अली खान आणि इमरान हाश्मी स्टारर देशभक्तीपर चित्रपट 'ऐ वतन मेरे वतन' नुकताच ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सारा अली खान उषा मेहता नावाच्या क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेत दिसत आहे. उषा मेहता यांनी रेडिओच्या माध्यमातून देशात क्रांतीचा नवा बिगुल फुंकला होता. सारा पहिल्यांदा देशभक्तीपर आधारित असलेल्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन्सनं केली आहे.

बंगाल 1947 : पीरियड ड्रामा फिल्म 'बंगाल 1947' ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी अभिनीत हा चित्रपट राजकीय घडामोडीवर आधारित आहे . 'बंगाल 1947', लेखक आणि दिग्दर्शन आकाशदीप लामा यांनी केलं आहे. हा चित्रपट 29 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

फाइटर : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे. या चित्रपटात दहशतवाद्यांनी केलेल्या पुलवामा हल्ल्याचा (2019) उल्लेख केला आहे, ज्यामध्ये देशाचे 40 हून अधिक जवान शहीद झाले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलंय.

बालाकोट एयरस्ट्राइक : 'बालाकोट एअर स्ट्राइक' हा पुलवामा हल्ल्याच्या बदल्यावर (१४ फेब्रुवारी २०१९) आधारित वेब सीरीज आहे. यामध्ये जिमी शेरगिल, आशिष विद्यार्थी, आशुतोष राणा आणि लारा दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वेब सीरीज तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म जोओ सिनेमावर पाहू शकता.

हेही वाचा :

  1. पुलकित आणि क्रितीच्या लग्नाच्या रिसेप्शनचे सुंदर फोटो, पाहा खास क्षण - Pulkit and kriti wedding reception
  2. 'भूल भुलैया 3'मधील कार्तिक आर्यनच्या एंट्री गाण्यात थिकरणार 1000 डान्सर्स - Bhool Bhulaiyaa 3 Song
  3. अंकिता लोखंडेच्या सासूचा दृष्टिकोन बदलला, चित्रपट प्रदर्शित होताच म्हणाली- 'माझी सून' - Ankita lokhande

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.