ETV Bharat / entertainment

सलमान खान आणि शाहरुख खान यांनी अनंत - राधिकाच्या लग्नात नीता अंबानीबरोबर केला डान्स - Salman Khan and Shah Rukh Khan - SALMAN KHAN AND SHAH RUKH KHAN

Salman Khan and Shah Rukh Khan : सलमान खान आणि शाहरुख खान यांनी अनंत - राधिकाच्या लग्नात नीता अंबानीबरोबर डान्स केला. आता सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

Salman Khan and Shah Rukh Khan
सलमान खान आणि शाहरुख खान (अनंत-राधिकाचं लग्न (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 10:22 AM IST

मुंबई - Salman Khan and Shah Rukh Khan : मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात शाहरुख आणि सलमान खानचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाहरुख आणि सलमान त्यांच्याच सुपरहिट चित्रपट 'करण अर्जुन' मधील 'भांगडा पावले' या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करून त्यांची सर्वांचं मन जिंकले आहेत. याशिवाय काही इतर अनेक स्टार्सही यावर डान्स करत होते. या दोघांचा हा सुंदर डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओत 'भाईजान' आणि 'किंग खान'मध्ये सुंदर बॉन्ड पाहायला मिळत आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नात सलमान -शाहरुख खाननं खूप धमाल केली.

अनंत आणि राधिकाचं लग्न धमाकेदार : जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या अनंत आणि राधिकाच्या लग्नात अनेक सेलिब्रिटींचा मीनाबाजार भरला होता. या लग्नात शाहरुख आणि सलमान सर्वाधिक चर्चेत राहिले. दरम्यान, या दोघांचा डान्स व्हिडिओ पाहून अनेकांना करण आणि अर्जुनची पुन्हा एकदा आठवण आली. 'करण अर्जुन' चित्रपटाचा दुसरा पार्ट येणार का ? असा प्रश्न काही चाहते करत आहेत. दरम्यान शाहरुख आणि सलमानमध्ये चांगली मैत्री आहे. या लग्नात 'किंग खान' आणि 'भाईजान'नं आपल्या डान्सनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर सलमान आणि शाहरुख खानच्या डान्सच्या व्हिडिओनं खळबळ उडवून दिली आहे. अनंत अंबानींच्या लग्नाच्या मिरवणुकीत शाहरुख आणि सलमाननं नीता अंबानीबरोबर सुंदर डान्स केला.

कुस्तीपटू जॉन सीना डान्स व्हिडिओ व्हायरल: शाहरुख आणि सलमान अनेकदा अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमात एकत्र दिसतात. अनंत अंबानींच्या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या उपस्थिनं या लग्नाची शोभा वाढवली. नुकतेच निवृत्ती घेतलेला दिग्गज कुस्तीपटू जॉन सीनाही अनंत-राधिकाच्या लग्नासाठी मुंबईत पोहोचला होता. यावेळी त्यानं देखील डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता सोशल मीडियावर राधिका आणि अनंतच्या लग्नामधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लग्नामध्ये जगातील अनेक नामांकित व्यक्त आले होते.

हेही वाचा :

  1. अनंत-राधिका अडकले विवाहबंधनात; जगभरातील दिग्गजांची हजेरी, लग्नाचा खर्च जाणून बसेल धक्का - Anant Radhika Wedding
  2. देशातील सर्वात महागडं लग्न संपन्न; अनंत-राधिका देश-विदेशातील व्हीव्हीआयपी पाहुण्यांच्या हजेरीत झाले 'सावधान' - Anant and Radhika Wedding
  3. अनंत-राधिकाचा शाही विवाह सोहळा, बॉलिवूड, हॉलिवूडसह विविध क्षेत्रातील दिग्गज राहणार हजर; पाहा लिस्ट - Radhika and Anant Ambani Wedding

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.