मुंबई - Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रचंड चाहते आहेत. आपल्या 32 वर्षांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत 'किंग खान'नं चित्रपटसृष्टीला अनेक अतुलनीय चित्रपट दिले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीत त्याचे योगदान कौतुकास्पद आहे. यासाठी किंग खानला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. आता 'किंग खान'च्या खात्यात आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे. त्याला लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये पारडो अल्ला कॅरीरा एस्कोना-लोकार्नो टूरिस्मो पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
SRK’s supremacy shines through—from his iconic scenes on the big screen to the thunderous cheers from the crowd, his heartfelt gestures to the people at the Locarno Film Festival, and his warm thanks to everyone for their love and for having him there! 👑@iamsrk… pic.twitter.com/p4C1Fkj4zV
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) August 10, 2024
शाहरुख खाननं मिळाला विशेष पुरस्कार : पारडो अल्ला कॅरीरा एस्कोना-लोकार्नो टूरिस्मो पुरस्कारानं सन्मानित होणारा शाहरुख पहिला भारतीय ठरला आहे. या कार्यक्रमात शाहरुख खान स्टारर संजय लीला भन्साळी यांचा 2002 मधील 'देवदास' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. मिळालेल्या सन्मानाचं सेलिब्रेशन करताना किंग खाननं इव्हेंटमध्ये आपली सिग्नेचर पोझ दिली. या पोझला पाहून अनेकांनी यावेळी शिट्ट्या मारल्या. आता सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
शाहरुख खाननं मानलं आभार : 'किंग खान'नं त्याला मिळालेल्या सन्मानाबद्दल लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये किंग खाननं आपला आनंद व्यक्त केला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर शाहरुखनं सुंदर भाषण दिलं. ट्रॉफी दाखवत यावेळी त्यानं म्हटलं, "खूप आभारी आहे." यानंतर त्यानं ट्रॉफी बाजूला ठेवली. शाहरुख खाननं त्याच्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपली सिग्नेचर पोझ दिली. यानंतर त्यानं इथे म्हटलं, "लोकार्नो या अतिशय सुंदर, अतिशय सांस्कृतिक, अतिशय सर्जनशील आणि अतिशय सुंदर शहरात मला सन्मानित केल्याबद्दल, मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. यानंतर, आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यानं हिंदीत म्हटलं, "मी मनापासून आणि संपूर्ण भारताच्या वतीनं तुमचे आभार मानू इच्छितो. नमस्कार आणि धन्यवाद. देव तुम्हा सर्वांचे चांगले करो." शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'किंग' चित्रपट दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर त्याची मुलगी सुहाना खान देखील असेल. 'किंग' चित्रपटाचं दिग्दर्शन सुजॉय घोष हे करणार आहेत.
हेही वाचा :
- शाहरुख खान लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलच्या 77व्या आवृत्तीत झाला सहभागी, स्टाईलिश पोस्टर व्हायरल - Shah Rukh Khan
- काजोलनं 21 वर्षात शाहरुख खानबरोबर केलेले 6 हिट चित्रपट, नक्की पाहा - 6 superhit movies
- शाहरुख खान विदेशात मुलासमेवत सुट्टीचा घेतोय आनंद, किंग खानला अचानक पाहताच चाहत्यांना सुखद धक्का - SHAH RUKH KHAN NEWS