ETV Bharat / entertainment

शाहरुख खान लंडनमध्ये कुटुंबासह खेळला क्रिकेट, फोटो व्हायरल - shah rukh khan - SHAH RUKH KHAN

Shah Rukh Khan in London : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान हा लंडनमध्ये आपल्या कुटुंबासह सुट्टीचा आनंद लुटत आहे. आत सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. यात शाहरुख आपल्या कुटुंबासह क्रिकेटचा आनंद घेताना दिसत आहे.

Shah Rukh Khan in London
शाहरुख खान कुटुंबासह लंडनमध्ये (सुहाना-शाहरुख खान (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 12:05 PM IST

मुंबई - Shah Rukh Khan in London : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सध्या लंडनमध्ये आहे. तो कुटुंबाबरोबर सुट्टीचा आनंद घेतोय. 'किंग खान' गेल्या आठवड्यात लंडनला रवाना झाला होता. अलीकडेच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो आपल्या कुटुंबासह पार्कमध्ये पिकनिक करताना दिसतोय. शाहरुख खानच्या फॅन क्लबनं 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत शाहरुख आणि मुलगी सुहाना खानची जोडी कुटुंबासह क्रिकेट सामना खेळताना दिसत आहे. किंग खान यावेळी कॅज्युअल आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

फॅमिली मॅच : सुहानाच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये शाहरुख फिल्डिंग करताना दिसत आहे. तर सुहानानं फलंदाजी निवडली आहे. आणखी काही लोकही या गेमचा एक भाग आहेत. फोटोत आजी सविता छिब्बरही कुटुंबावर लक्ष ठेवताना दिसत आहेत. बेंचवर आरामात बसून ती फॅमिली मॅच एन्जॉय करत आहे. शाहरुख अलीकडेच त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाच्या कामासाठी लंडनला पोहोचला होता. त्यानं आपल्या कुटुंबाला देखील सहलीवर नेलं. दरम्यान हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच सुहाना वडील शाहरुखबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटाचं काम पुन्हा सुरू करण्यापूर्वी वडील-मुलीची जोडी लंडनमध्ये काही ॲक्शन सीनचं शूटिंग सुरू करतील.

शाहरुख खानचं 2023 वर्ष : शाहरुखचे चाहते त्याच्या या चित्रपटाची वाट खूप आतुरतेनं पाहात आहेत.'किंग खान'साठी 2023 वर्ष खूप खास होतं. या वर्षी त्याचे तीन रिलीज झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले होत. यात 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी'चा समावेश आहे. शाहरुखच्या 'जवान' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एक इतिहास रचला. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर सर्वच भारतीय चित्रपटांचे रिकॉर्ड मोडले. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर साऊथ अभिनेत्री नयनतारा ही मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला. आता पुढं शाहरुख हा 'टायगर वर्सेस पठाण' या चित्रपटात सलमान खानबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

मलायका अरोरानं खास मैत्रीण करिश्मा कपूरला पाठवल्या 'पन्नाशी'च्या शुभेच्छा - Karisma Kapoor birthday

"दीपिकाचं होणारं बाळ 'कल्की'सारखाच चित्रपट बनवेल", कमल हासनचे उद्गार - Kalki 2898 AD

प्रभास स्टारर 'थीम ऑफ कल्की'चा प्रोमो रिलीज, मथुरेत होणार लॉन्चिंग - PRABHAS STARRER KALKI 2898 AD

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.