दुबई - Shah rukh khan : ग्लोबल स्टार शाहरुख खान आज 14 फेब्रुवारी रोजी दुबई येथे आयोजित वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 च्या 11 व्या आवृत्तीमध्ये सहभागी झाला आहे. शाहरुख खाननं या कार्यक्रमात 'द मेकिंग ऑफ अ स्टार' या थीमवर चर्चा केली. काल रात्री शाहरुख खान मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. 'वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट'मध्ये शाहरुख खानबरोबर त्याची मॅनेजर पूजा ददलानीही येथे पोहोचली होती. शाहरुख खानने या शिखर परिषदेत अध्यक्षपद भूषवले. पूजानं शाहरुख खानचा वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. आता किंग खानचा हा व्हि़डिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
शाहरुख खान वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये पोहचला : पूजानं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खान काळ्या सूट-बूटमध्ये आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना पूजानं लिहिलं की, ''वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट.'' व्हिडिओत शाहरुख खान त्याच्यासोबत बसलेल्या व्यक्तीबरोबर मजेशीर बोलताना दिसत आहे. या चर्चेला 'द मेकिंग ऑफ अ स्टार: अ कॉन्व्हर्सेशन विथ शाहरुख खान' असं नाव देण्यात आलं आहे. पुजानं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खान स्वत:ला चायनीज बाँड म्हणत आहे. किंग खाननं मदिनत जुमेराह येथे 10:35 वाजता 'द मेकिंग ऑफ अ स्टार: अ कॉन्व्हर्सेशन विथ शाहरुख खान' या विषयावर चर्चा करताना त्याच्या स्टारडम आणि आयुष्याच्या प्रवासाविषयी सांगितलं. ही चर्चा 15 मिनिटांची झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
शिष्टमंडळाचे नेतृत्व : डब्ल्यूजीएस 2024 ची थीम 'भविष्यातील सरकारांना आकार देणे' आहे. या थीम अंतर्गत 25 हून अधिक सरकार आणि राज्यांचे प्रमुख या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या परिषदेत भारत, कतार आणि तुर्की या देशांचे पाहुणे म्हणून निवड करण्यात आली आहे. तीन अतिथी देशांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल रहमान बिन जसीम अल थानी आणि तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन करत आहेत. या समिटमध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील 4,000 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
हेही वाचा :